Sharad Pawar on EVM Machine : पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे ईव्हीएमविरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव (Baba Adhav) यांचं आत्मक्लेष आंदोलन सुरु आहे. आज जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ईव्हीएम पहिल्यांदाच अगदी थेटपणे अविश्वास व्यक्त केला. ईव्हीएम मशीन कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिले होकते. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांना त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनीही ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला.
ईव्हीएम कसे सेट केले जाते याचे प्रेझेंटेशन आम्हाला काही लोकांनी दिलं होतं. आमची कमतरता होती की आम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता निवडणुकीत इतके काही टोकाचे होईल असा अंदाज नव्हता. असे कधी वाटलेही नव्हते. आम्ही याआधी कधीही निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला नव्हता. पण आताच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यात काही तथ्य दिसत आहे.
राज्यातील 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) अर्ज दाखल केले आहेत. पण यातून काही साध्य होईल का याबाबत मला शंका वाटते, असेही शरद पवार यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर करण्यात आलाय. या निवडणुकीत पैशांचा महापूर आला होता, अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.
VIDEO : उठाव केला पाहिजे, अन्यथा.. लोकशाही धोक्यात; शरद पवारांनी घेतली बाबा आढावांची भेट
राज्यामध्ये आणि देशात पैशांचा वापर करून विधानसभा निवडणूक (Maharashtra Politics) जिंकल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता आगे. जे लोक संसद अन् संसदेच्या बाहेर भेटले त्यांना जयप्रकाश नारायण यांची आठवण झालीय. पाच लोकांमध्ये चर्चेचा सूर असून बाबा आढाव यांनी पुढाकार घेवून त्यांनी आत्मक्लेष आंदोलन सुरु केलंय. बाबा आढाव यांनी एकट्याने ही भूमिका घेणं योग्य नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. लोकांनी देखील उठाव केला पाहिजे अन्यथा लोकशाही धोक्यात येईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.