Download App

युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास जबरदस्त किंमत मोजावी लागेल : पवारांचा शिंदे सरकारला इशारा

पुणे : युवकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण मध्यस्थी करु. त्यासाठी सर्व मागण्या एकत्रित करा, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घाला. बैठक बोलवू, त्यावेळी या मागण्यांबाबत विचारमंथन करण्यासाठी आपण स्वतः उपस्थित राहु आणि मुख्यमंत्र्यांकडून मागण्याबाबत सकारात्मक उत्तर घेऊ, असे आश्वासन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते पुण्यात आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते. (NCP Chief Sharad Pawar talk on youth in Yuva Sangharsh Yatra in pune)

राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांच्या पुणे-नागपूर युवा संघर्ष यात्रेचा आज पुण्यातून शुभारंभ झाला. यावेळी शरद पवार यांनी भाषणातून तरुणांपुढील प्रश्नांचा आढावा घेतला. ते म्हणाले, असाच एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. आम्ही त्यावर सभागृहात आवाज उठला. पण प्रश्न सुटला नव्हता. म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढली होती. आजची युवा संघर्ष यात्रा ही नव्या पिढीची दिंडी आहे. नव्या पिढीला आत्मविश्वास देणारी, प्रोत्साहन देणारी आहे.

Rohit Pawar : आम्ही मुद्द्याचं बोलतो, तुम्हीही मुद्द्याचंच बोला! रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं

युवा संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास जबरदस्त किंमत मोजावी लागेल :

पवार पुढे म्हणाले, तुम्ही या संघर्ष यात्रेची सुरुवात केली, तेव्हा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला. तुम्ही जेव्हा नागपूरमध्ये पोहोचाल, तेव्हा मला खात्री आहे की सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असल्यास लोकशाही मार्गाने काढण्यात आलेल्या या यात्रेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कोणी दुर्लक्ष केले तर त्याची जबरदस्त किंमत सरकारला द्यावी लागेल. त्यामुळे ही यात्रा अत्यंत महत्वाची आहे.

शाळा आहे, पण शिक्षक नाहीत. शिक्षक भरती झाली पाहिजे. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांच्या आजूबाजूला आयटी सेक्टरचा विकास झाला पाहिजे, अशीही मागणी यावेळी पवार यांनी केली. यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीची आठवण उपस्थित तरुणांना सांगितली.

Pune Metro : स्वप्न पूर्ण होणार! मेट्रो ट्रेन पिंपरीपासून आता थेट निगडीपर्यंत, केंद्राची मंजुरी

आम्ही मुद्द्याचं बोलतो तुम्हीही मुद्द्याचंच बोला :

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला नंतर कमिटी स्थापन केली, महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी कमिटी स्थापन केली. या कमिट्यांचं पुढं काय झालं अशा कमिट्या स्थापन करून काहीच होत नसतं. राज्याचे प्रकल्प गुजरातला जातात त्याचं वाईट वाटतं. बुलेट ट्रेनसाठी कोट्यावधी खर्च करता पण, कशाला पाहिजे बुलेट ट्रेन? तोच पैसा शेतकरी, सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी खर्च करा. नाटकं न करता राज्यात गुंतवणूक कशी येईल यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी विनंती करतो. युवा संघर्ष यात्रा आता काही थांबणार नाही. तेव्हा आम्ही मुद्द्याचं बोलतो तुम्हीही मुद्द्याचंच बोला, अशा शब्दांत रोहित पवार यांनी यावेळी राज्य सरकारला ठणकावलं.

Tags

follow us