Download App

‘भावी मुख्यमंत्री, जादूई आकडा अन् वेळेचं गणित’ गुगली प्रश्नांना अजितदादांचं ‘सेफ’ उत्तर

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुणे शहरात ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशाही चर्चा सुरू असतात. पण, बॅनरचं राजकारण काय?, मुख्यमंत्री कसं होता येतं?, भाजपसोबत जायला खरंच उशीर झाला का? या पत्रकारांच्या गुगली प्रश्नांची अजितदादांनी अगदी सेफ उत्तरं दिली.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सकाळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना पुण्यात लागलेल्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या बॅनरबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, अलीकडे आपल्याकडे एक नवीन फॅड निघाले आहे. अनेक ठिकाणी कार्यरकर्ते असे बॅनर लावतात. माझेही असे मुख्यमंत्रीपदाबाबतचे बॅनर लागलेत असे माझ्या कानावर आले आहे. काही ठिकाणी राज ठाकरेंचेही (Raj Thackeray) बॅनर लागलेत. काही ठिकाणी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचेही बॅनर आहेत.

थोरातांचा इशारा, विखेंचा अ‍ॅक्शन मोड! ‘निळवंडे’च्या पाण्याचे ‘शेड्यूल’च सांगितले

कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. तुम्हाला आठवत असेल मागे एकदा मुंबईत राष्ट्रवादी भवनाच्या बाहेर माझे, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांचेही बॅवर लागले होते. हे काही आम्ही कुणी सांगत नाही. मी तर नेहमी सांगत असतो की असं कुणी बॅनरवर भावी मुख्यमंत्री, भावी पालकमंत्री लिहून सांगितल्याने होत नाही. कुणाला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 145 आमदारांचा जादूई आकडा गाठावा लागतो. ज्यांना या 145 आमदारांचा पाठिंबा मिळेल तो मुख्यमंत्री होतो. याआधी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) हा आकडा गाठला असे म्हणताच पत्रकाराने त्यांना तुम्ही लेट झालात असे मध्येच टोकले.

कुणाची वेळ कधी येईल सांगता येत नाही

त्यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, लेटचा प्रश्न नाही. लेट कुणीच नसतं. हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो. त्यानंतरही पत्रकारांनी त्यांना आता वेळ कधी येईल? असे विचारले. त्यावरही अजितदादांनी दिलखुलास पण तितकंच सेफ उत्तर दिलं. वेळ कधी येईल सांगता येत नाही. आपण आपलं काम करत राहायचं. शेवटी जनतेचं प्रेम घेत घेत त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. सगळ्यांना न्याय देता आला पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे हा आम्हा लोकांचा दृष्टिकोन आहे. आणि आम्ही जो निर्णय घेतला तो लोकांच्या कामाकरता घेतला.

‘फक्त 40 तासांत राष्ट्रवादी, शिवसेना आमदारांचा निकाल’; राऊतांचा मोठा दावा

भाजपसोबत जायला खरंच उशीर झाला का?

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना भाजपसोबत जायला उशीर झाला का?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना अजितदादांनी (Ajit Pawar) आता ही चर्चा करून काही उपयोग आहे का? असा सवाल केला. आता आलेल्या प्रसंगांना सामोरे जायचे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे हा दृष्टीकोन आम्ही ठेवल्याचे अजित पवार म्हणाले.

Tags

follow us