Mla Bapusaheb Pathare : वडगावशेरी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांचा मागील काही दिवसांपासून विविध भागात पाहणी दौरा धडाक्यात सुरू आहे. आमदार पठारे यांनी आज 11 डिसेंबर रोजी लोहगाव तसेच वडगावशेरी परिसरात पालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केलीयं. यावेळी पठारे यांनी लोहगाव, राखपसरे वस्ती, लोहगाव-वाघोली रोड येथील स्मशानभूमी तसेच लोहगाव बुद्ध विहार या ठिकाणी बारकाईने पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
धक्कादायक, साताऱ्यात जामिनासाठी न्यायाधीशांनीच घेतली 5 लाखांची लाच, गुन्हा दाखल
पाहणीदरम्यान, बापूसाहेब पठारे तसेच अधिकारी वर्गाला अनेक गोष्टींच्या उणीवा जाणवल्या आहेत. या उणीवा तातडीने भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्याचे बापूसाहेब पठारे यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील विविध भागांची पाहणी केल्याशिवाय तिथल्या सद्यपरिस्थितीची कल्पना येणार नाही. त्याशिवाय ठोस उपाययोजनांची अंमलबजावणीही करता येणे कठीण आहे.
शिंदे गटाच्या नेत्याचं मंत्रिमंडळावर मोठं विधान; गृहखात्याबद्दलही सांगितली आतली गोष्ट
ज्या भागातील पाहणी करण्यात आलीयं, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन प्रश्न सोडवण्यास मदत होत असल्याचं मत यावेळी बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केलंय. या पाहणी दौऱ्यादरम्यान, पुणे महापालिका भवन अधिकारी प्रफुल्ल भातकर, आरोग्य निरीक्षक नायडू, समीर खुळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.