Download App

Rohit Pawar : ‘फडणवीस अभ्यासू पण, जास्त खोटं बोलतात’; कंत्राटी भरतीवरून रोहित पवारांचा खोचक टोला

Rohit Pawar : राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयावर विरोधकांनी मोठा गदारोळ केल्यानंतर काल अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयाची माहिती देताना त्यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर याचे खापर फोडले. त्यांच्याच काळात कंत्राटी भरतीचे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे पाप आमच्या माथी नको, असे म्हणत त्यांनी हे निर्णय रद्द केल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. यानंतर विरोधी पक्षांनीही त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचे सांगितले.

रोहित पवार यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला. तसेच आमच्या नेत्यांना माफी मागायला लावण्याऐवजी कंत्राटी भरतीचा पहिला जीआर 1998 मध्ये आला होता. तेव्हा भाजपाच्याच नेत्यांनी माफी मागितली पाहिजे असे सांगितले. ते पुढे म्हणाले, अजितदादा आमच्या सरकारच्या काळातही उपमुख्यमंत्री होते. दादा तिथं असते तर त्यांनी त्यांना लगेच सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलत आहात. देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. पण ते आता जास्त खोटं बोलत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार

युवा संघर्ष यात्रेला यश येताना दिसत आहे. सरकारनेही या यात्रेची दखल घेतली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा जीआर मागे घेतला आहे. पोलिसांकडूनही या यात्रेची माहिती घेण्यात आली आहे. म्हणूनच जीआर मागे घेण्यात आला. काल पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तेथे नव्हते. नाहीतर अजितदादांनी त्यांना तिथच उत्तर दिलं असतं, असे पवार म्हणाले.

भाजपाच्याच लोकांनी नाक घासून माफी मागावी

14 मार्च 2023 रोजी त्यांनी जीआर काढला होता. सगळे जीआर त्यांच्याच सरकारने काढले होते. पण, आता सरकार आणि भाजपा खोटं बोलत आहेत. सगळे पद कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला होता. आम्ही काढेलला जीआर हा काही मर्यादित पदांसाठी होता. तुम्ही 2014 मध्ये सत्तेत आला तेव्हा हा जीआर रद्द का नाही केला असा सवाल रोहित पवार यांनी केला. 1998 मध्ये पहिला जीआर निघाला तेव्हा राज्यता कुणाचं सरकार होतं? तुम्ही आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागायला सांगतात तुम्ही 1998 चा जीआर वाचा. म्हणून भाजपच्या लोकांनी आमच्या नेत्यांची माफी मागावी. भाजपच्या नेत्यांनी माफी मागत नाक घासावं अशी मागणी पवार यांनी केली.

आता सरकारने तातडीने नव्या नोकरभरतीसाठी आदेश काढायला हवा. अडीच लाख पद रिक्त आहेत ती भरली गेली पाहिजेत. समित्या स्थापन केल्या जात आहेत पण समित्या काम करत नाहीत. जालना, पालघर अशा ठिकाणी समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांनी काय काम केलं असा सवाल त्यांनी केला.

जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक

Tags

follow us