शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार

  • Written By: Published:
शिरूरच्या लोकसभेवरून महायुतीत मिठाचा खडा?; वळसे पाटलांनी दावा ठोकल्याने संघर्ष वाढणार

पुणे : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार घेऊन राज्याच्या सत्तेत वाटा तर मिळवला. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यास कारण शिरूर लोकसभेची (Shirur Loksabha Seat) जागा ठरताना दिसत असून, सीटिंग सीट ज्यांची आहे त्यांना त्या जागा सोडल्या जातील असं ठरल्याचे म्हणत अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते माजी खासदार आढळराव पाटील यांचं काय?,असा प्रश्न उपस्थित झाला असून, याच जागेवरून येत्या काळात महायुतीत संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Dilip Walse Patil On Shirur Loksabha Seat For 2024 Election)

मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप

शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. मात्र आता या जागेवर अजित पवार गटाकडूनदेखील दावा केला गेला आहे. दुसरीकडे मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शरद पवार गटाच्या बैठकीत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पवारांकडे केली आहे. यानंतर लगेचच अजित पवार गटाचे नेते वळसे पाटलांनीदेखील यावर प्रतिक्रिया देत शिरूरच्या जागेवर दावा ठोकला आहे. यामुळे महायुतीमध्ये यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले वळसे पाटील?

वळसे पाटील म्हणाले, सगळेच पक्ष आपल्या तयारीला लागतात त्याप्रमाणे त्यांनीदेखील तयारी केलेली आहे. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिका मांडल्या असून, नेते निर्णय घेतील. मात्र महायुतीत जी सीटिंग सीट आहे ती त्या पक्षाला देणार असल्याचा निर्णय झाला आहे. मात्र याला काही जागा अपवाद आहेत. आम्ही शिरूर लोकसभा मतदारसंघावर दावा करणार आहोत. शिरूरचा उमेदवार वळसे पाटलांच्या घरातील असेल की नाही याचा निर्णय पक्ष घेईल, असंही पाटील म्हणाले.

जरांगेंनी फोडला भुजबळांचा हुकमी एक्का; गोळाबेरीज करताना होणार दमछाक

शिरूरच्या जागेसाठी महेश लांडगेंचे नाव चर्चेत?

गत निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांच्यात लढत झाली होती. यामध्ये कोल्हे यांनी बाजी मारली होती. मात्र आता पुलाखालून बरचं पाणी वाहून गेल असून, बरीच राजकीय समीकरण बदलली आहेत. आजघडीला आढळरावांनी ठाकरेंची साथ सोडत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. अजित पवारदेखील आपल्या काकांची साथ सोडत महायुतीचे भाग झाले आहे. तर, दुसरीकडे भाजपनेदेखील आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याची रणनीती आखल्याच बोललं जातं आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील हे तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत 2024 च्या लोकसभेला शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळेल या आशेने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले खरे मात्र, अजित पवार गटाची महायुतीत एन्ट्री आणि आता शिरूर लोकसभेवर केलेला दावा पाहता महायुतीत यावरून मिठाचा खडा पडू शकतो असं मत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट

शिरूरच्या जागेवरून काय म्हणाले होते रोहित पवार?

नुकतेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी यावर टिप्पणी करत असताना 2024 ला शिरूर मधून अजित पवार गटाकडून वळसे पाटील देखील उमेदवार असू शकतात, असा अंदाज व्यक्त केला होता. यामुळे शिरूर लोकसभेच्या जागेचा तिढा महायुती कसा सोडवणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube