मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप

मधोमध पलंग, नवदाम्पत्यानं पकडापकडी खेळायची का?; शहर नियोजनावरुन राज ठाकरेंचा संताप

Raj Thackeray : सौदर्यदृष्टी ही मुळातच राज्यकर्त्यांमध्ये असायला हवी. तुम्ही खाली कितीही टाहो फोडा. ज्या महानगरपालिकेमध्ये (Municipal Corporation), राज्य सरकारमध्ये (State Govt) डेव्हलपमेंट प्लॅन होतो, पण टाऊन प्लॅनिंग (Town Planning)होत नाही, टाऊन प्लॅनिंग जर झाले नाही तर ही बकाल शहरं अशीच राहतील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी आरोप केला. शहर नियोजन (City planning) आणि सौदर्यदृष्टी यावरुन राज ठाकरे यांनी सरकारचे चांगलेच वाभाडे काढले आहेत.

Aatur: ‘मूल हवं म्हणून धडपडणाऱ्या महिलेची कथा; ‘आतुर’ सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त शहर नियोजन, सौदर्यदृष्टी आणि शास्वत विकास या मुद्द्यावर राज ठाकरे यांची मुलाखत लेखक दीपक करंदीकर यांनी पुण्यात घेतली. यावेळी राज ठाकरे यांना विचारलेल्या प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिली.

Ghaziabad : कॉलेजच्या कार्यक्रमात ‘जय श्री राम’च्या घोषणा; विद्यार्थ्याला स्टेजवरुनच हाकललं; नेमकं घडलं तरी काय?

राज ठाकरे सांगितले की, आज महापालिकांमध्ये, राज्य सरकारसह केंद्र सरकारमध्ये जेवढं महत्व इंजिनिअरला आहे तेवढं आर्किटेकला नाही. त्यामुळे तुमचे रस्ते कसे असणार? तुमच्या वास्तु कशा असणार? हे इंजिनिअर ठरवतो, ते आर्किटेक नाही ठरवत. याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी आपल्याला सर्किट हाऊसबद्दल आलेल्या अनुभवाबद्दल सांगितले.

ते म्हणाले की, सर्किट हाऊसमध्ये मोठ-मोठी बाथरुम असतात, मग काय परत परत अंघोळ करायची त्याच्यामध्ये, असा खोचक सवालही यावेळी ठाकरे यांनी केला. मध्यंतरी मी बीडमध्ये गेलो होतो, ते सर्किट हाऊस एरिगेशनचं होतं.

तिथल्या बेडरुममध्ये गेलो. बेडरुमचा मोठा हॉल होता. त्याच्या मधोमध पलंग होता, त्या ठिकाणी जर नवविवाहित दाम्पत्य गेलं तर त्यामध्ये पकडापकडी खेळणार का? त्या ठिकाणी मधोमध पलंग का ठेवला असेल? असाही सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube