Ghaziabad : कॉलेजच्या कार्यक्रमात ‘जय श्री राम’च्या घोषणा; विद्यार्थ्याला स्टेजवरुनच हाकललं; नेमकं घडलं तरी काय?

Ghaziabad : कॉलेजच्या कार्यक्रमात ‘जय श्री राम’च्या घोषणा; विद्यार्थ्याला स्टेजवरुनच हाकललं; नेमकं घडलं तरी काय?

Ghaziabad : उत्तर प्रदेशमधील (UP)गाझियाबादच्या Ghaziabad एबीएसई इंजीनिअरींग कॉलेजमधील (ABSE Engineering College) सांस्कृतिक कार्यक्रमात स्टेजवरुन विद्यार्थ्याने जय श्री रामच्या घोषणा दिल्या. त्यावर एका शिक्षिकेने आक्षेप घेतला, या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral)झाला आहे. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संजय राऊतांनाच बेड्या ठोका, त्यांनीच ललित पाटीलला.. शिंदे गटाचा नेता भडकला

काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान तरुणाने टीमला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, त्यावरुन पोलिसांनी त्या तरुणाला हटकले होते, त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर आता गाझियाबादमधील एका नामांकित कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमात जय श्री रामच्या (Jai Shri Ram)घोषणा दिल्याने, उपस्थित एका शिक्षिकेने घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला स्टेजवरुन खाली उतरवले. त्यावरुन दोन गटांमध्ये राडा झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

झालं असं की, गाझियाबादमधील एबीएसई इंजिनीअरींग कॉलेजमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात एक विद्यार्थी स्टेजवर आल्यानंतर समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या, त्याला उत्तर म्हणून स्टेजवर असलेल्या विद्यार्थ्याने देखील जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

स्टेजवरुन जय श्री रामच्या घोषणा दिल्यानंतर समोर बसलेल्या एका शिक्षिकेने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर स्टेजवरुन घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्याला चांगलेच सुनावले. तुम्ही या ठिकाणी घोषणाबाजी करण्यासाठी आलेले नाही, हा कॉलेजचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे, अशा शेलक्या शब्दांमध्ये शिक्षिकेने त्या विद्यार्थ्याला सुनावले. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला स्टेजवरुन खाली उतरण्यास सांगितले.

या घटनेमुळे काही वेळ कार्यक्रमस्थळी वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये शिक्षिका त्या विद्यार्थ्याला विचारतात की, तुम्हाला घोषणाबाजी करण्यासाठी व्यासपीठ दिले आहे? तुम्ही स्टेजवर जय श्री राम कसे बोललात? त्यावर विद्यार्थ्याने सांगितले की, विद्यार्थ्यांमधून जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात होत्या. मी पण त्यांना उत्तर दिले. यावर त्या शिक्षिकांनी त्या विद्यार्थ्याला चांगलेच खडसावले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओचा तपास सुरु केला आहे.

या व्हायरल व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळत आहेत. काही जण विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत, तर काहिंनी शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे घोषणाबाजी केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. कॉलेज व्यवस्थापनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube