Rupali Chakankar : महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविषयी फेसबूक व यूट्यूबवर आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवराज विलास चव्हाण यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलै रोजी दुपारी रुपाली चाकणकर फेसबूक लाईव्ह करत असताना दोघांनी आक्षेपार्ह शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चव्हाण हे चाकणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात सोशल मीडियाचे काम पाहतात.
Yugendra Pawar : पवारांनी फोडलं अजितदादांच घर?; युगेंद्र पवार पहिल्यांदाच राजकीय फ्रेममध्ये
तसेच 8 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक येथे सभा होती. यावेळी सुप्रिया सुळे यांचे भाषण एका टिव्ही चॅनेलच्या युट्यूबवर सुरु होते. तेव्हा काही जणांनी आक्षेपार्ह शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. चव्हाण यांच्या तक्रारीवरुन सात जणांच्या विरोधात आयपीसी 354 ए, 509 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पवार चुकले मग काय गोळ्या घालणार का? सदाभाऊ खोत यांचं पुन्हा वादग्रस्त विधान
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपद सोपविले आहे. त्यानंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्यातील संघर्षात नेते व कार्यकर्तेदेखील एकेमेकांवर तोंडसुख घेत आहे. रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी एक फोटो ट्विट करत थेट सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला होता.