Download App

पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ; जाहीर सभेत शरद पवारांनी दिला शब्द

Sharad Pawar News : ‘पुरोगामी विचारांसाठी आमची अखंड साथ राहणार’ असल्याचा शब्दच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी दिला आहे. पुण्यात आज भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने ‘सत्यशोधक समाज’ स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संम्मेलन आयोजित करण्यात आलं. या संम्मेलनाचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले, ‘हा वेळकाढूपणा, पैशाचा खेळ…’

शरद पवार म्हणाले, आजचा दिवस ऐतिहासिक आहे, याच दिवशी महात्मा फुले यांनी ‘सत्यशोधक’ समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांनी उजव्या लोकांच्या हातातली सत्ता आणि त्यांच्या विरोधात संघर्ष करुन हे पाऊल टाकलं, त्यांनी अनेक गोष्टी केल्या असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

Mumbai : अमित शाह लालबागच्या राजाच्या दर्शनाला; CM शिंदेंच्या आमदारकीसाठी साकडं घातलं?

तसेच महात्मा फुले यांनी गुलाममगिरी अस्पृश्येला विरोध केला, छत्रपती शाहू महाराजांनी थोतांड विचारांचा विरोध केला होता आता आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे, समाजात जी वाईट प्रवृत्ती वाढत चालली, त्याचा विरोध करायचा ही शपथ आपण घेतली पाहिजे, असंही शरद पवार म्हणाले आहेत.

India Canada Conflict : अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य

दरम्यान, सध्या सुरु असलेल्या उजव्या सत्तेविरोधात आमची पुरोगामी विचारांसाठी अखंड साथ राहणार असल्याचं शरद पवार यांनी या संम्मेलनात स्पष्ट केलं आहे. भारत मुक्ती मोर्चाच्यावतीने आज सत्यशोधक समाज स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी सत्यशोधक संम्मेलनाचं आयोजन केलं होतं.

यावेळी शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या संम्मेलनाला इतिहासकार म.देशमुख यांच्यासह हमाल पंचायत संस्थापक, बाबा आढावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड आदी उपस्थित होते.

Tags

follow us