अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले, ‘हा वेळकाढूपणा, पैशाचा खेळ…’

  • Written By: Published:
अपात्रतेच्या निर्णयाबाबत लागेल तेवढा वेळ घेणार; नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले, ‘हा वेळकाढूपणा, पैशाचा खेळ…’

Asim Sarode on Rahul Narvekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय घ्यायचा आहे. सुप्रिम कोर्टाने ११ ने रोजी सत्तासंघर्षाचा निकाल देतांना अपात्रतेचं प्रकरण राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सोपवलं. त्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर पहिली सुनावणी १४ सप्टेंबरला झाली. त्यावेळी नार्वेकरांनी पुन्हा एकदा सुनावणी पुढं ढकलली होती. त्यानंतर नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यासाठी सुनिल प्रभूंनी कोर्टात धाव घेतली. दरम्यान, एका आठवड्यात सुनावणी घ्या, असे आदेश कोर्टाने दिलं. मात्र, अपात्रतेबाबत कारवाई करण्यासाठी लागेल तेवढा वेळ घेणार, असं वक्तव्य नार्वेकरांनी केलं. यावर आता यावर वकील असिम सरोदेंनी (Asim Sarode) प्रतिक्रिया दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

नार्वेकरांनी केलेल्या वक्तव्याविषयी असीम सरोदेंना विचारलं असता ते म्हणाले की, संवैधानिक तरतुदीनुसार न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर कालमर्यादा घालू शकत नाही. विधानसभेच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही. याचाच गैरफायदा विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. सुप्रिम कोर्ट आपल्याला आदेश देऊ शकत नाही, हे नार्वेकरांना ठाऊक आहे.

‘पण, त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, विधानसभा अध्यक्ष जर बेकायदेशीरपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आम्हाला त्यांच्या कामकाजाचे विश्लेषण करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर 28 किंवा 29 तारखेला सुनावणीची तारीख ठरवतील, असं सरोदे म्हणाले.

IND vs AUS : श्रेयस अय्यर-शुभमन गिलचे खणखणीत शतकं, दोनशे धावांची भागीदारी

राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत आहेत. कारण, त्यांना संविधान मानायचं नाही. पळून गेलेल्या आमदारांना लोकांनी मनातून अपात्र केलं आहे. त्यामुळं आमदारांना निवडणूक अत्यंत अवघड होणार आहे. पैशाचा खेळ फार काळ चालणार नाही. हे भारतीय लोकशाही दाखवूनि देईल, असं सरोदे म्हणाले.

काय म्हणाले राहुल नार्वेकर?
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर केला जाईल. संविधानाने न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ अशी कामाची विभागणी करून दिली आहे. त्या कार्यक्षेत्रात राहून सर्वांना काम करणं अपेक्षित आहे. अपात्रतेच्या बाबत निर्णय घेण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची दिरंगाई करणार नाही. परंतु, कोणतीही घाई देखील केली जाणार नाही. घटनात्मक तरतुदी आणि विधानसभा अपात्रतेच्या नियमांचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ. यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. मी घेतलेला निर्णय बेकायदेशीर किंवा असंवैधानिक असणार नाही. जो निर्णय घेतला जाईल, तो घटनेने दिलेल्या तरतुदीनुसार असेल. त्यासाठी लागेल तेवढा वेळ मी घेणार आहे. कोणतीही संस्था मला रोखू शकत नाही, असं विधान नार्वेकर यांनी केलं.

आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकर हे पुढील आठवड्यात सुनावणी घेणार आहेत. या सुनावणीसाठी सीएम एकनाथ शिंदे आणि उबाठाचे नेते उद्धव ठाकरे या गटांच्या प्रमुखांना बोलावले जाऊ शकते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube