Download App

“बच्चा है पर…” : दोन ओळींचे कॅप्शन अन् 54 सेकंदाचा व्हिडीओ, रोहित पवार अजितदादांना थेट भिडले!

Image Credit: Letsupp

पुणे : “बच्चा है पर मन का सच्चा है! दिल है साफ, नफरत से है दूर” अशा कॅप्शनसह 54 सेकंदाचा एक हिंदी गाण्याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिले. पण त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेली खोचक टीका रोहित पवार (Rohit Pawar) यांना चांगलीच जिव्हारी लागली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. (NCP (Sharad Pawar faction) MLA Rohit Pawar replied to Deputy Chief Minister Ajit Pawar’s criticism.)

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने नुकतीच (ED) छापेमारी केली. बारामती येथील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. यात सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावरही निशाणा साधला.

“त्याला कोणी सांगितले श्रीमंतीवरुन आरक्षण? मग तर तु उद्याच बाहेर पडणार” : जरांगेंचे भुजबळांना प्रत्युत्तर

त्याला प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. रोहित पवार कच्चा आहे. कच्चा-बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी, एवढा काय तो मोठा झालेला नाही. त्याला माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तरं देतील. पण  तुम्हाला सगळ्याना ठाऊक आहे, मागे माझ्याही 22 ठिकाणांवर कारवाई झाली.

“शरद मोहोळ हिंदुत्ववादी होता, म्हणून त्याची हत्या…” : भाजप आमदाराची मुक्ताफळे

शेवटी स्वायत्त संस्थांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, जर तथ्य असेल तर बाहेर येत, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते. आजच नाही. तपास यंत्रणा अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत असतात. पण माध्यमे मोजक्याच प्रकरणांना प्रसिध्दी देतात. वर्षभरात अनेकांची चौकशी झाली आहे.द रम्यान, आणखी एकाने पुन्हा रोहित पवारांविषयी विचारले असता “मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, मी सौम्या गोम्यांना उत्तरं देत नाही,” असे टीकेची पुनरावृत्ती त्यांनी केली.

follow us

वेब स्टोरीज