कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही केलं विजयस्तंभाला अभिवादन

कोरेगाव-भीमामध्ये भीम अनुयायांची गर्दी, अजित पवारांनीही केलं विजयस्तंभाला अभिवादन

Koregaon Bhima: कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) या ठिकाणी आज 206 वा शौर्य दिन (Shourya Din) साजरा केला जात आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासााठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. आज पहाटे पासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले.

Koregaon-Bhima : विजयस्तंभाच्या जागेचा वाद हायकोर्टात, 8 जानेवारीला होणार सुनावणी 

1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमाच्या पेरणे फाट्यावर इंग्रज आणि पेशवे यांच्यात लढाई झाली. यावेळी ब्रिटिश सैन्याच्या महार बटालियनच्या जोरावर इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला. या युद्धानंतर ब्रिटीशांनी महार बटालियनच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारला. 1 जानेवारी 1927 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिन साजरा केला जातो. या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी आले आहेत. भीम अनुयायांची संख्या लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आहे.

New Year 2024 : या राशीच्या लोकांसाठी भाग्याचे ठरणार नवीन वर्ष, आर्थिक समस्या होणार दूर 

आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दरवर्षी प्रमाणे आज विजयस्तंभाला साडेसहा वाजता अभिवादन केलं. या ठिकाणी शासनाने उत्तम व्यवस्था केली. आज इथं येणाऱ्या नागरिकांनी कायदा व सुव्वस्था राखावी. पोलिसांनी सर्वांनी सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी, असं सांगितलं. यावेळी त्यांनी जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांना हे नवीन वर्ष भरभराटीचं जावो, असं म्हणाले.

मंत्री चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेतेही कोरेगाव भीमा येथे येणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी पीएमपीएमएल बसेस चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या.

1 जानेवारी 2018 ला हिंसाचार
1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. याचा परिणाम संपूर्ण देशावर झाला. या ठिकाणी मोठी दंगल व जाळपोळ झाली. यात एक तरुण ठार झाला होता. त्यानंतर औरंगाबाद, माजलगाव, परभणी, सोलापूर शहरातही दंगल सदृश्य परिस्थिती झाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube