पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) माध्यमातून ‘नदी सुधार’ हा प्रकल्प (River Improvement Project) हाती घेण्यात आला. या कामामुळे अनेक झाडांची कत्तल होणार असल्याने शहरातील पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्ती केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या वतीने पुणे महापालिकेच्या (Pune News) उद्यान विभागाच्या कार्यालयाबाहेर झाडावर बसून राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी अनोखे आंदोलन केले आहे. (NCP Protest) तर यावेळी भाजप आणि पुणे महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली जात आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, पुणे शहरात विकास कामांना आमचा विरोध नाही. पण विकास काम करत असताना, पर्यावरणाचा देखील भाजप आणि महापालिका प्रशासन थोडा विचार करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नसल्याने आता नदी पात्र सुधार प्रकल्प अंतर्गत हजारो झाडांची कत्तल करण्यात येत आहे.
नियमानुसार आम्ही झाड लावणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आजवर पुणे महापालिका प्रशासनामार्फत झाडे काढल्यावर कोणत्याही ठिकाणी झाडे लावण्यात आली नाही. यामुळे या नदी पात्रात झाडांचे देखील तेच होणार आहे. यामुळे झाडांची कत्तल झाल्यास आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यावरण प्रेमींनी यावेळी दिला.