पुण्यात खळबळ ! मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणीची मागणी; दोघांविरुद्ध गुन्हा
पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांच्या नावाने एका बांधकाम व्यावासायिकाकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून (Kothrud Police) दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police) या प्रकरणी संदीप पिरगोंडा पाटील, शेखर गजानन ताकवणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रस्ता) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपी पाटील, ताकवणे यांच्या विरुद्ध खंडणी, धमकावणे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पौड रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय आहे. २ दिवसाअगोदर आरोपी पाटील, ताकवणे यांनी बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्यात आला होता.
कुठल्याही पहाटे काहीही होऊ शकतं..चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान; शिंदे गटाचं वाढलं टेन्शन
माजी महापौर मुरलीधर मोहोळ, त्यांच्या मावसभावाचा नावाचा वापर करून त्यांनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. भारतीय जनता पक्षाच्या युवा माेर्चाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता ३ कोटी रुपये हवे आहेत. पैसे न दिल्यास भविष्यात बांधकाम व्यवसायाला हानी पोहोचवू, अशी धमकी आरोपी पाटील आणि ताकवणे यांनी दिली.
आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हा धक्कादायक प्रकार बांधकाम व्यावसायिकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.