Download App

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग अनावर, पुतण्याने 35 वर्षीय तरुणाचा काटा काढला…

चुलतीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून पुतण्याने 35 वर्षीय तरुणाला ठार केल्याची घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

  • Written By: Last Updated:

पुणे : दिवसेंदिवस पुण्यातून गुन्हेगारीच्या (Pune Crime) अनेक घटना समोर येत आहेत. आताही पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलतीसोबत गैरवर्तन केल्याच्या रागातून पुतण्याने 35 वर्षीय तरुणाला ठार केल्याची घटना पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या (Chandannagar Police Station) हद्दीत घडली आहे.

पुनीत बालन ग्रुप आयोजित संयुक्त दहिहंडी डिजेमुक्त साजरी होणार; ढोल ताशा, बॅन्ड अन् पारंपारिक वाद्य वाजणार 

चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याच्या रागातून पुतण्याने हॉकी स्टिकने खून केला. ही घटना काल (मंगळवार) रात्री सुमारे ११:३० वाजताच्या सुमारास आंबेडकर वसाहत येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृताचे नाव साईनाथ उर्फ ‘खलीबली’ दत्तात्रय जानराव (वय ३५, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर, पुणे) असे असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी राहुल रामचंद्र गिरमे यांनी फिर्याद दिली आहे. आदित्य संतोष वाल्हेकर उर्फ सोन्या (वय २१, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) आणि समर्थ उर्फ करण पप्पू शर्मा (वय २२, रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

दंगल भडकवू नका, एकाही पोराला धक्का लागला तर महाराष्ट्र कायमचा बंद करणार; जरांगेंचा फडणवीसांना इशारा 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार साईनाथ यांनी आरोपी आदित्यच्या चुलतीशी अयोग्य वर्तन करून तिला ‘आय लव्ह यू’ असे म्हटल्याची माहिती आदित्यला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या आदित्यने आपला मित्र समर्थसोबत मिळून साईनाथला हाताने, लाथाबुक्यांनी आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण केली. या मारहाणीत साईनाथ ठार झाला.

दरम्यान, घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने शोध घेऊन त्यांना अटक केली. तसेच भारतीय न्याय संहिता कलम 103(1)3(5) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

follow us