चंदननगरमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश..एका पीडित तरुणीची सुटका…

  • Written By: Published:
124

Prostitution business in Chandannagar exposed : चंदननगर परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका पीडित तरुणीची सुटका केली आहे. डेला थाई स्पा येथे ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती. यानुसार पथकाने सदर ठिकाणी बनावट गि-हाईक पाठवून खात्री केली. त्यानंतर मसाज सेंटरमध्ये स्पा मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालु असल्याचे आढळले. तसेच, पथकाने येथून एका पिडीत महिलेची देखील सुटका केली आहे.

झालेल्या कारवाईमध्ये मोबाईल व रोख रक्कमेसह एकुण वीस हजार रूपयांचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, स्पा मॅनेजर याला ताब्यात घेवुन व स्पा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

ठाकरे-राऊतांचा अध्यक्षांना दम; फडणवीस म्हणाले, दबावाला बळी न पडता योग्य वेळी…

दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे यांच्या पथकाने केली आहे.

Tags

follow us