Download App

निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाईड स्टोरी, मैत्रिणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Nilesh Chavan Arrest : वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणाबाबत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आता निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी समोर आली आहे. पुण्यातून पसार झालेला निलेश त्याच्या मैत्रीणीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

पुन्हा कोरोनाचा कहर! देशात रुग्णांची संख्या 3700 च्या पुढे; आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण निलेश चव्हाण याच्याभोवती फिरत आहेत. या प्रकरणात ज्यावेळी निलेशचं नाव समोर आलं, त्यानंतर तो २१ मे रोजी फरार झाला. त्याने आपल्या घटस्फोटित मैत्रिणीशी संपर्क साधला आणि तिला फिरायला जायची विनंती केली. त्या दोघांनी दिल्लीपर्यंत एकत्र प्रवास केला. निलेश पुण्यातून पसार झाला तेंव्हापासून ही मैत्रीण त्याच्या सोबत होती. प्रवासादरम्यान निलेशने तिच्या मोबाईलचा वापर करून एका मित्राला कॉल केला. विशेष म्हणजे, निलेशचा तो मित्र आधीच पोलिसांच्या रडारवर होता. याच फोनमुळे निलेश चव्हाणला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. हा फोन कॉल ट्रेस केल्यानंतर पोलिस थेट नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचले होते आणि तिथेच पोलिसांनी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Video : कोणत्या दिवशी होणार पहिले ‘शाही स्नान’; नाशिक कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर 

दरम्यान, निलेश चव्हाणला नेपाळच्या सीमेवरुन अटक करण्यात आल्यानंतर बावधन पोलिसांनी शिवाजीनगर येथील कोर्टात हजर केलं. कोर्टाने चव्हाणच्या तपासासाठी ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता तीन जूनपर्यंत पोलिसांकडे वेळ असून भक्कम पुरावे कोर्टात सादर करावे लागणार आहेत.

दरम्यान, या संपूर्ण प्रकऱणात निलेशच्या घटस्फोटित मैत्रिणीचा गुन्ह्याशी थेट संबंध नाही. त्यामुळं चौकशीअंती पोलिसांनी तिला सोडून दिलं आहे.

निलेशच्या घरातून पोलिसांनी काय जप्त केले?
निलेश चव्हाणच्या घरातून तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. हे मोबाईल फोन शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे यांचे आहेत. तसेच निलेशची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट देखील जप्त करण्यात आला आहे.

 

 

follow us