Video : कोणत्या दिवशी होणार पहिले ‘शाही स्नान’; नाशिक कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर

Kumbhamela Nashik Schedule : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Kumbhamela) नियोजनाची बैठक घेतली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. या बैठकीत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील अमृत स्नान, शाही स्नानच्या ताराखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली. साधू महंत या बैठकीला उपस्थित होते. मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. या बैठकीला 10 शैव आखाड्यांचे 20 महंत तर 3 वैष्णव आखाड्यांचे 6 महंत उपस्थित होते. या बैठकीपूर्वी कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रमुख स्नानाला शाही स्नान न म्हणता अमृत स्नान म्हणून संबोधले जावे, अशी मागणी महंत राजेंद्र दास महाराज यांनी केली आहे.
मोठी बातमी! बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला पुन्हा अटक; थेट दिल्लीतून घेतलं ताब्यात
31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे. या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर, 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे.
29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल. तर 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ मेळाचा ध्वज हा खाली उतरवण्यात येईल. या दिवशीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील.
कोणतं स्नान कोणत्या दिवशी आहे?
पहिले अमृस्नान -2-08-2027
द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृस्नान – 12- 09-2027
नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख
31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृस्नान -2-08-2027
द्वितीय अमृस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृस्नान – 11- 09-2027