भारत-पाकिस्तानमधील युद्धाची तारीख ठरली? 1971 च्या मॉकड्रीलचा फॉर्मुला रिपीट होणार…

भारत-पाकिस्तानमधील युद्धाची तारीख ठरली? 1971 च्या मॉकड्रीलचा फॉर्मुला रिपीट होणार…

India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा हल्ला झालेला नाही. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या हाती चावी सोपवली आहे. भारताचा आक्रमक दृष्टिकोन आणि पाकिस्तानच्या कृती पाहता युद्ध निश्चित मानलं जातंय.

भारतासोबत युद्ध झाल्यास…खिसेकापू अन् चोरांपासून कोण वाचवणार? पाकिस्तानला वेगळंच टेन्शन

अब्दुल बासित यांच्या विधानाव्यतिरिक्त, भारताच्या तयारीवरून असेही सूचित होतंय की, भारत 10 किंवा 11 मे रोजी पाकिस्तानवर हल्लाबोल करेल. विशेष म्हणजे पाकिस्तानात बसलेल्या लोकांना देखील हे माहित (India Pakistan War) आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलिकडेच हे विधान केलंय. त्यांनी सांगितले की, रशियातील विजय दिनानंतर भारत कदाचित 10-11 मे रोजी पाकिस्तानवर हल्ला करेल.

रशिया 9 मे हा दिवस विजय दिन म्हणून साजरा करतो. पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, परंतु पाकिस्तानसोबतच्या तणावामुळे त्यांनी ही भेट रद्द केल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या जागी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाणार (India Pakistan War Date) होते, परंतु आता तेही जात नसल्याचं समोर आलंय.

ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा

उद्या देशातील 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जाईल. यामध्ये नागरिकांना युद्धादरम्यान स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचे प्रशिक्षण दिले जाईल. लोकांना जागरूक केले जाईल. या सरावादरम्यान सायरन देखील वाजवला जाईल आणि 1971 नंतर हे पहिल्यांदाच घडणार आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही म्हटलंय की, भारत कधीही काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर लष्करी हल्ला करू शकतो

मॉक ड्रिलनंतर 4 दिवसांनी युद्ध

1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धापूर्वी अशा प्रकारची मॉक ड्रिल शेवटची आयोजित करण्यात आली होती. ही ड्रिल झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले. त्यानंतर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एक मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली अन् 3 डिसेंबर रोजी युद्ध सुरू झाले.

मॉक ड्रिलपूर्वी हवाई दलाने उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवेवर एक सराव सराव केला, ज्यामध्ये लढाऊ विमानांनी त्यांची ताकद दाखवली. मागील शुक्रवारी हवाई दलाने एक्सप्रेसवेवर दोन टप्प्यात अभूतपूर्व लष्करी सराव केला. यामध्ये, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी उड्डाण, लँडिंग, टेक-ऑफ आणि कमी उंचीवरील फ्लाय-पास्ट यासारख्या लढाऊ तंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झालेले रात्रीचे लँडिंग हे सरावाचे मुख्य आकर्षण होते. यातून भारतीय हवाई दलाच्या अत्याधुनिक क्षमता सिद्ध करून दाखवल्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube