Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी रेल्वेची ‘पर्वणी’; सुमारे ९९२ विशेष गाड्या सोडणार, ९९३ कोटींची तरतूद

  • Written By: Published:
Kumbh Mela: कुंभमेळ्यासाठी रेल्वेची ‘पर्वणी’; सुमारे ९९२ विशेष गाड्या सोडणार, ९९३ कोटींची तरतूद

Special trains for Kumbh Mela : पुढील वर्षी जानेवारीमध्ये प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनच्यावतीने विशेष ९९२ रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये (Kumbh Mela) सहभागी होण्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि रेल्वेस्थानकांसह विविध रेल्वेशी निगडित विविध ठिकाणांच्या नूतनीकरणासाठी रेल्वे मंत्रालयाच्या वतीने ९९३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

३० कोटी ते ५० कोटी भाविक

रेल्वे गाड्यांची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी रेल्वेमंत्रालयाच्या वतीने प्रयागराज विभाग आणि आसपासच्या विभागातील रेल्वेमार्गांचे दुपदरीकरणदेखील वेगात सुरू आहे. यासाठी सुमारे तीन हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रायगराज येथे १२ जानेवारी पासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सुमारे ३० कोटी ते ५० कोटी भाविक येण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi: हे मोदी अन् भाजप सरकार नसून अदानी अन् अंबानी सरकार; राहुल गांधींचा घणाघात

विशेष ९९२ रेल्वे गाड्यांसह विविध शहरातून नियमित येणाऱ्या सहा हजार ५८० रेल्वे गाड्यांची वाहतूकदेखील सुरळीत व्हावी यासाठी प्रशासनाच्या योग्य ती उपाययोजना आखली जात आहे. त्याचप्रमाणे गरज पडल्यास येथील रेल्वेची संख्या आणखीही वाढवण्यात येईल असंही रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

रेल्वे मंत्र्यांनी घेतली बैठक

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी रेल्वे राज्यमंत्री रवनीतसिंग बिट्टू आणि व्ही. सोमण्णा यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे वैष्णव हे उत्तर रेल्वे, उत्तर मध्य रेल्वे आणि ईशान्य रेल्वे या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सगद्वारे नियमित बैठका घेत आहेत, अशी माहितीही रेल्वे मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या