MPSC Exam: एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार

MPSC Exam: एमपीएससीतही पूजा खेडकर प्रकरणाची पुनरावृत्ती? निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रार

RTI Activist Vijay Kumbhar :  गेली काही दिवसांपासून युपीएसीद्वारे आयएएसपदी निवड झालेल्या पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात आडकलेल्या आहेत. तसंच, त्यांच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर आल्याने त्यांच्यावर युपीएससीसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये सध्या चौकशी सुरू आहे. (Vijay Kumbhar) अशातच आता राज्यातही अशी प्रकरणं समोर येण्याची शक्यता आहे. याबाब महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही मोठा निर्णय घेतला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी माहती दिली आहे.

काय म्हणाले कुंभार? Pune Rain: मुरलीधर मोहोळांचा चौकशीचा सूर; पाणी सोडताना सावध का केल नाही? चौकशी करणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा-२०२२च्या निवड यादीतील ८ जणांविरुद्ध तक्रारी आल्यानं महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने अर्जदार आणि प्रतिसादकर्त्यांनी अपिलीय प्राधिकरणासमोर उपस्थित राहून दिव्यांग प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. पडताळणीचे निर्णय ५ ऑगस्ट, २०२४ पर्यंत संबंधित प्राधिकरण आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)ला कळवायचं आहेत. अपिलीय प्राधिकरणासमोर गैरहजर रहाणाऱ्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद मानलं जाऊन त्यांना निवड प्रक्रियेतून वगळलं जाणार आहे.

 लाल दिवा चर्चा पॅरिस ऑलिम्पिक! इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटन समारंभ स्टेडियमबाहेर, परेडमध्ये भारताचा नंबर कितवा?

लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याप्रकरणी चर्चेत असणाऱ्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना अपंग आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीच केली होती. दरम्यान, पूजा खेडकर यांची चौकशी सुरू असू सध्या त्याही फरार झाल्या आहेत.  त्यांची वाशिम जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली होती. दरम्यान, त्यांची आणि त्यांच्या कुटंबाची अनेक प्रकरणं समोर आली होती. त्यांनी लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारल्याप्रकरणी चांगल्याच चर्चे आल्या होत्या. आताही अपंग प्रमाणपत्र आणि ओबीसी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रावरुन त्या चर्चेत आहेत.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube