अडचणी वाढल्यामुळे पूजा खेडकर फरार?, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याकडून ‘हे’ गंभीर मुद्दे उपस्थित
Vijay Kumbhar on Pooja Khedkar case : वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. (Vijay Kumbhar) दोनवेळा समन्स बजावून त्या आल्या नाहीत. त्यानंतर मसूरी येथील आयएएस प्रशिक्षणार्थींसाठी असणारी लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये त्यांना २३ जुलैपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्या हजर झाल्या नाहीत. कदाचित त्यांना कळलं असावं की आता आपल्याकडे पळवाट राहिली नाही. त्यामुळे त्या पळून गेल्या असाव्यात, असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
दोन कोटींचा बंगला पूजा खेडकर मसुरीला गेल्याच नाहीत? मुदत संपल्यानंतरही नॉट रिचेबल
या विषयात विजय कुंभार म्हणतात की, पूजा खेडकर यांना कळलं आहे की आता आपल्याकडे पळवाट राहिली नाही. त्यांची आई कारागृहात आहे. वडिलांची चौकशी सुरु आहे. अडचणी आल्यामुळे त्या पळून गेल्या असाव्यात. मनोरमा खेडकर यांच्याकडे दोन कोटींचा बंगला आहे. कोट्यवधींची संपत्ती आहे. त्यानंतर त्यांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्नही त्यांनी त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रतिज्ञापत्र खोटं दिलं
1995 ते 2005 च्या काळात 1 लाख 60 हजार स्केअर फूटाची जागा त्यांनी स्वतःच्या पैशातून घेतली आहे. नॅशनल सोसायटीत 45 लाखांची जागा घेतली आणि त्यावर दीड कोटींचा बांधकाम केलं. एवढी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला नॉन क्रिमिलेअर कसं मिळू शकतं? असा थेट प्रश्न कुंभार यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं आहे ते खोटं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत ते पती- पत्नी असल्याचं दाखवलं आहे. उत्पन्न जाहीर केलं आहे. एकंदरीत त्यांच्याकडे सर्व गोंधळ आहे. या सर्व प्रकरणाची दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचनेही चौकशी सुरु केली आहे असंही ते म्हणाले.
घटस्फोट घेतल्याचं भासवलं ठाकरे-परबांवर खोटे आरोप करण्यासाठी दबाव; फडणवीसांचं नाव घेत देशमुखांचे आरोप
केंद्र सरकारने खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची माहिती मागितली आहे. त्यावर बोलताना विजय कुंभार म्हणाले की, 2003 पासून घटस्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. ते विभक्त झाले आहेत की नाही याचा फरक पडत नाही. मनोरमा खेडकर यांचे वडील आणि पती हे क्लास वन अधिकारी होते त्यांना नॉन क्रिमिलेअर घेता येत नव्हतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतल्याचं भासवलं आहे असंही कुंभार म्हणाले आहेत.
Even if we assume that #PujaKhedkar's mother, Manorama, was separated from Dilip Khedkar since 2003, she was ineligible for a #NonCreamyLayer (NCL) certificate. She possessed significant properties including 16,000 https://t.co/VbEak3sJKq of commercial property (1995-2005), a… pic.twitter.com/YGJNsp9dK7
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) July 24, 2024