या प्रकरणात त्या हलक्यात सुटणार नाहीत; पूजा खेडकर प्ररणावर विजय कुंभारांची सडेतोड मुलाखत
Vijay Kumbhar Exclusive on Letsupp : वादग्रस्त ठरलेल्या IAS अधिकारी पूजा खेडकर या ज्या प्रकरणात सापडलेल्या आहेत त्या काही सहजासहजी सुटणार नाहीत. तुम्ही फक्त पाहत राहा असा थेट दावा माहिती अधिकार कार्यकर्ते (Vijay Kumbhar ) विजय कुंभार यांनी केला आहे. ते लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत दिली. (Pooja Khedkar) त्यामध्ये त्यांनी हा दावा केला आहे. तसंच, त्यांनी यावेळी या प्रकरणावर अनेक गोष्टींकडं लक्ष वेधलं आहे.
IAS पूजा खेडकर की झोलकर? अपंग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर आईची अनधिकृत कंपनी
या प्रकरणात राजकीय काही हस्तक्षेप आहे का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले राजकीय हस्तक्षेपापेक्षा पैशांचा जास्त वापर झाला असावा अशी शक्यता आहे असं कुंभार म्हणाले आहेत. यामध्ये गडबड झाली हे कुणी दुसऱ्याने नाही तर त्यांचे कागदच स्पष्ट सांगत आहे की या प्रकरणात गडबड आहे. तसंच, पहिली गोष्ट म्हणेज, पास झाल्यावर वैद्यकीय परीक्षा दिली नाही. खोटी माहिती देऊन उत्पन्नाची कागदपत्र दिली असंही कुंभार यावेळी म्हणाले आहेत. सध्या जे चित्र दिसतय ते पूर्ण प्रमाणपत्र खोटे देऊन त्यांनी आरक्षण आणि परीक्षा दिल्या आहेत असा दावाही त्यांनी केला आहे.
जर पुण्याचे जिल्हाधिकारी सुवास दिवसे यांनी जर अहवाल पाठवला नसता तर या अशाच अधिकारी राहिल्या असत्या का? असा प्रश्न विचारला असता कुंभार म्हणाले, तसं झालं असत किंवा त्यांचं वागणं पाहता ते पुढे कुठेतरी उघड पडलच असतं. दरम्यान, एकदा नौकरी लागली की हे अधिकारी एकमेकांना सहकार्य करतात असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
तर मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन; IAS पूजा खेडकर प्रकरणात बच्चू कडुंची उडी!
अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते कसं मिळवलं यावर ते म्हणाले, अपंगत्वाचं प्रमाणपत्र पूजा खेडकर यांनी तीनवेळा वेगवेगळी कारणं देऊन मिळवली. त्यांना एक युनिक आयडी मिळतो. तो एकच राहतो. त्याचा फायदा घेऊन त्यांनी युपीएससी परीक्षा दिली. त्या पास झाल्यानंतर युपीएससीने सहावेळा सांगितलं की तुम्ही मेडीकल परीक्षा देण्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी ती दिली नाही. हे असतानाही त्यांना पुणे जिल्हा मिळाला. हे आक्षेपाहार्य होतं. त्यानंतर 2022 ला त्यांनी पुन्हा एकदा प्रमाणपत्र काढलं. त्यामध्यो दोन अर्ज केले. एक पत्ता औंधचा, दुसऱ्याला पत्ता पिंपरी चिंचवडचा. परंतु, हे असं करता येत नाही. कारण पहिलं क्लिअर करून हे अर्ज करावे लागतात. परंतु त्यांनी तसं केलं नाही असा मोठा खुलासा कुंभार यांनी केला.
या प्रकरणातून जर पूजा खेडकर सुटल्या तर या देशात लोकशाही राहीलेली नाही. प्रशासन राहिलेलं नाही असं कुंभार म्हणाले. कारण सर्वच गोष्टींवरील लोकांचा विश्वास उडेलं. आज पुण्यात पाहिलं तर सात-सात मुलं एकत्र राहतात हे कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत हे मुलं काही पूजा खेडकर आणि तत्सम लोकांना अधिकारी करण्यासाठी पुण्यात राहतात का? असं संतापही व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आज देशात अनेक ठिकाणी असे अधिकारी आहेत ज्यांनी खोट प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवलेली आहे असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.