मुंडेंमागील आरोपांचा ससेमिरा काही संपेना; आता RTI कार्यकर्ते विजय कुंभार दंड थोपटून मैदानात

पुणे : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून कृषी घोटाळ्यांबाबत धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात असतानाच आता RTI कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनीदेखील धनंजय मुंडेंविधात गंभीर आरोप करत दंड थोपटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (RTI Activist Vijay Kumbhar Serious Allegations On Dhananjay Munde)
अंजलीताई GR काढण्याची प्रक्रिया समजून घ्या, अर्धवट बुद्धीचे प्रदर्शन करू नका, धनंजय मुंडेंचा टोला
कुंभार यांचे आरोप नेमके काय?
धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विषय विना परवानगी आणणे, बैठकीसमोर न आलेल्या विषयाला मान्यता मिळाली म्हणून टेंडर काढणे असे अनेक प्रकार केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केले आहेत.विजय कुंभार यांनी याबाबत सोशल मिडियावरती पोस्ट लिहली आहे.
VIDEO : शरद पवारांची मोठी फसवणूक…संजय राऊतांची आगपाखड, शिंदेंवर हल्लाबोल
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात की, काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचे भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले. त्यानंतर काही जणांनी, असं घडणं शक्य नाही. मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचे भासवणे शक्य नाही, अशी भाषा वापरायला सुरुवात केली. परंतु हे काही प्रथमच घडलं आहे अशातला भाग नाही.यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. मी स्वतः त्याबाबत तक्रार केली होती. महाराष्ट्रातील बहुचर्चित आपत्कालीन रुग्णसेवेसाठी ॲम्बुलन्स घेण्याचा प्रस्तावही वादात होता.त्यामध्येही १३ मार्च २०२४ रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झाला आहे असं भासवून १५ मार्च रोजी लगेच त्याच्या कामाचा शासन आदेश काढण्यात आला होता.
यासंदर्भात मी मंत्रालयात मुख्य सचिव कार्यालयात कागदपत्रांचे अवलोकन केले असता तो प्रस्ताव अतिरिक्त प्रस्ताव म्हणून बैठकीत ठेवला होता परंतु तो मंजूर झाला नव्हता असे दिसून आले. (मंत्रिमंडळ बैठकीत नियमित आणि अतिरिक्त अशा दोन कार्यपत्रिका ठेवण्यात येतात. दोन्ही पैकी मंजूर झालेल्या प्रस्तावांचे नंतर एकत्रित इतिवृत्त तयार करण्यात येते.) या बाबतची जनहित याचिकाही मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतली आहे. त्यामुळे मंत्रालयात किंवा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सगळं काही नियमानुसार चालतं अशा भ्रमामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही.ज्यांना त्या भ्रमात राहायचंय त्यांनी खुशाल रहावं, त्या बाबतीत हरकत नाही.
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; करूणा शर्मांनी सुप्रिया सुळेंसमोर मांडली कैफियत
परंतु प्रश्न असा पडतो की अशा वेळी तक्रार कुणाकडे करायची आणि त्याचा उपयोग काय? कारण ज्यांच्याकडे तक्रार करायची त्यांनाही सगळं माहिती असतं किंबहुना ते त्यात सामिल असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा प्रस्ताव,काम किंवा निविदा मंजूर होते तेव्हा त्यापूर्वी अनेक गोष्टींची पडताळणी करावी लागते.म्हणजे त्यासाठी आर्थिक तरतूद आहे का? सगळ्या बाबी कायदेशीर आहेत का ? संबंधित सर्व विभागांची मान्यता आहे का? वगैरे वगैरे आणि हे सर्व पाहण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते.
परंतु जे अधिकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेल्या प्रस्तावांची तो मंजूर झाला आहे असे भासवून कागदपत्रे रंगवतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? आणि मंत्री मात्र अंगाशी आलं की अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून मोकळे होतात.असं केलं तरचं करोडो रुपयांची माया जमा होते,रंगेल आयुष्य जगता येते आणि चार्टर फ्लाईटने परदेश दौरे करता येतात ना? असे कुंभार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काल धनंजय मुंडे कृषी घोटाळ्यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला नसताना तो मंजूर झाल्याचे भासवून शासन आदेश काढल्याचे आरोप झाले.त्यानंतर काही जणांनी, असं घडणं शक्य नाही.मंत्रिमंडळातील ठराव झाले नसताना झाले असल्याचे भासवणे शक्य नाही, अशी भाषा वापरायला सुरुवात केली.… pic.twitter.com/W5bbtgrkUG
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) February 20, 2025