नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर; महाकुंभात जाण्यासाठी झाली होती गर्दी

Stampede At New Delhi Railway Station : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर (New Delhi Railway Station) चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळतेय. या घटनेत 17 लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणात रेल्वेकडून अधिकृतपणे किती लोक जखमी झाले आणि किती लोकांचा मृत्यू झालाय, हे सांगण्यात आलेलं नाही. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात (Stampede) आलंय. दुसरीकडे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, आरपीएफचे महासंचालक आणि इतर अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् त्यांनी चौकशी केलीय.
नवी दिल्ली रेल्वे स्थानक हे संवेदनशील रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. येथून दररोज पाच लाखांहून अधिक लोक ये-जा करतात. अशा परिस्थितीत, गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी आरपीएफकडून विशेष कर्मचारी येथे तैनात केले जातात. असं असून देखील या प्रकरणात रेल्वे अधिकारी किंवा आरपीएफ अधिकारी गर्दीचा अंदाज घेऊ शकले नाहीत. गर्दीबद्दल त्यांच्याकडून कोणतेही इनपुट देण्यात आले (Kumbh Mela) नाही. रेल्वे अधिकाऱ्यांना स्टेशनवरील गर्दीवर लक्ष ठेवता आलं नसल्याचा आरोप केला जातोय.
कुठलीही कॉम्प्रोमाईज नाही…, धस – मुंडे भेटीवर बावनकुळेंचा मोठा गौप्यस्फोट
रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे 24 तास देखरेख ठेवली जाते. डीआरएम त्यांच्या कार्यालयात स्टेशनच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मचे लाईव्ह फुटेज पाहतात. तरीही त्यांना स्टेशनवरील गर्दी दिसत (Stampede At New Delhi Railway Station) नव्हती. दुसरीकडे, रेल्वेकडून जनरल तिकिटे सतत दिली जात होती. यावरून नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी किती होती, हे समजू शकते.
#WATCH दिल्ली: वीडियो नई दिल्ली रेलवे स्टेशन के प्लेटफार्म नंबर 14 से है, जहां कल रात 10 बजे के आसपास हुई भगदड़ में 15 लोगों की मौत हो गई और कई अन्य घायल हो गए। pic.twitter.com/oy8NlwtBUt
— ANI_HindiNews (@AHindinews) February 16, 2025
नेमकी ही चेंगराचेंगरी कोणत्या कारणाने झाली, यासंदर्भात रेल्वेकडून स्पष्ट माहिती दिली जात नाहीये. प्रयागराजला जाणाऱ्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं प्लॅटफॉर्मवर गर्दी वाढली. पण रेल्वे प्रशासनाने ट्रेन रद्द झाल्या, याला स्पष्टपणे नकार दिलाय. उलट त्यांनी म्हटलंय की, चार विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत रेल्वेकडून याप्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.
मोठी बातमी! 1 एप्रिलपासून 19 धार्मिक स्थळांवरील दारूची दुकाने होणार बंद
दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी म्हटलंय की, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. मी मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांशी बोललो आहे. त्यांना परिस्थिती हाताळण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांना मदत कर्मचारी तैनात करण्यास सांगितलंय. मुख्य सचिव आणि पोलिस आयुक्तांना घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आणि मदत उपाययोजनांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.