मोठी बातमी! बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला; रेल्वे स्टेशनवरील स्फोटात २५ ठार
आर्थिक संकटाने हैराण झालेल्या पाकिस्तानात बॉम्बस्फोट नित्याचेच झाले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Explosion at Pakistan Quetta Railway Station : आर्थिक संकटाने हैराण झालेल्या पाकिस्तानात बॉम्बस्फोट (Pakistan News) नित्याचेच झाले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. आताही रेल्वे स्टेशनवर झालेल्या बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरला आहे. या स्फोटात जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 50 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात काही लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. क्वेटा शहरात दोन बॉम्बस्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. एका स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या स्फोटात 15 लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट कुणी केला, यामागे काय कारण होतं याचा तपास केला जात आहे. या स्फोटांची जबाबदारी अजून तरी कोणत्याच संघटनेने घेतलेली नाही. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी रेल्वे स्टेशनवर गर्दी झाली होती. स्फोट झाल्यानंतर येथे पळापळ झाली.
बापरे! पाकिस्तानने प्रदूषणात मोडले सर्व रेकॉर्ड; ‘या’ शहरात AQI 2000 पार
पाकिस्तानात नेहमीच बॉम्बस्फोट होत असतात. आतापर्यंत या स्फोटांत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. याआधी काही दिवसांपूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. पाकिस्तानातील अशांत प्रांत नॉर्थ वजीरिस्तान भागात झालेल्या बॉम्ब स्फोटात चार सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाला होता. बरेच जण जखमी झाले होते. खैबर पख्तूनख्वा मध्ये एका शाळेजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाला होता. बलूचिस्तान प्रांतातही एका शाळेजवळ स्फोट झाला होता. या स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. कमीत कमी 22 जण जखमी झाले होते. यानंतर क्वेटामधील सर्व रुग्णालयांत आणीबाणी घोषित करण्यात आली होती.