बापरे! पाकिस्तानने प्रदूषणात मोडले सर्व रेकॉर्ड; ‘या’ शहरात AQI 2000 पार

बापरे! पाकिस्तानने प्रदूषणात मोडले सर्व रेकॉर्ड; ‘या’ शहरात AQI 2000 पार

Air Pollution in Pakistan : पाकिस्तानच्या दक्षिण पंजाब प्रांतातील मुलतान (Air Pollution in Pakistan) शहरात प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. या शहरातील AQI (Air Quality Index) 2553 वर पोहोचला आहे. या अतिशय प्रदूषित हवेत श्वास घेणे अत्यंत कठीण झाले आहे. याच प्रदूषणामुळे मुलतान जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर बनलं आहे. हवेत प्रदूषण प्रचंड वाढल्याने सार्वजनिक ठीकाणी लोकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. उद्याने, म्युझियम, क्रीडांगणे या ठिकाणी नागरिक आता येऊ शकत नाहीत. लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करता शाळा आणि महाविद्यालये काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहेत.

भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही. राजधानी दिल्लीतील हवा अतिशय प्रदूषित झाली आहे. दिल्लीत बारा ठिकाणे अशी आहेत जिथे हवेची गुणवत्ता 400 म्हणजे अत्यंत खराब श्रेणीत पोहोचली आहे. लोकांना मास्क वापरण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या मते, ज्या लोकांना श्वसनाच्या समस्या आहेत त्यांनी गरज असल्यासच घराबाहेर पडावे. रुग्णालयात श्वसन विकाराच्या रुग्णांची संख्या आधीच्या तुलनेत जास्त वाढली आहे.

पाकिस्तानचा ३ वर्षांनंतर मायदेशात मालिका विजय; तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव

पाकिस्तानचा विचार केला तर येथील अनेक शहरांत प्रदूषणाने विक्राळ रुप धारण केले आहे. स्मॉगमुळे लाहोर शहरातील लोकांना घराबाहेर पडल्यानंतर अंधारल्यासारखे दिसत आहे. येथील दृश्यमानता बरीच कमी झाली आहे. समोरील काहीही स्पष्ट दिसत नाही अशी परिस्थिती येथे आहे. या प्रदूषणामुळे लाहोर, मुलतानसह अन्य शहरांत आरोग्याचं संकट गंभीर झालं आहे.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम लाहोर, गुजरांवाला, फैसलाबाद, मुलतान, शेखुपूरा, कसूर, ननकाना साहिब, हफीजाबाद, मंडी बहाउद्दीन, सियालकोट, नरोवाल, चिनयट, झंग, टोबा टेक सिंह यांच्यासह लोधरन या शहरांवर होईल. पाकिस्तानातील जियो न्यूजच्या रिपोर्टनुसार, सरकारी अधिसूचनेनुसार प्रभावित जिल्ह्यांतील उच्च माध्यमिक खासगी आणि सरकारी शाळा १७ नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.

लाहोरमध्ये प्रदूषणाची दाहकता

लाहोरमध्येही प्रदूषण खूप वाढलं आहे. लाहोर पाकिस्तानातील एक मोठं शहर आहे. भारताच्या जवळ असलेल्या परिसरात AQI 1900 इतका वाढला आहे. हा संपूर्ण परिसर हवेच्या खराब गुणवत्तेचा सामना करत आहे. या भागाच्या आसपास असणारी शहरे आणि गावांत प्रदूषणाचा जाड थर निर्माण झाला आहे. वाहनांद्वारे आणि कारखान्यांतून निघणारा धूर, शेतकऱ्यांकडून शेतात जाळला जाणारा कचरा यांमुळे येथील प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सावधान! प्रदूषणामुळे ‘या’ आजाराचा गंभीर धोका; जाणून घ्या, कसे राहाल सुरक्षित..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube