वाहन धारकांचं टेन्शन वाढलं! No PUC… No fuel, प्रताप सरनाईकांचे सक्तीचे आदेश निघाले

भविष्यात वाहन विक्री करणाऱ्या शोरूम व वाहन दुरुस्ती करणारे गॅरेजमध्ये देखील प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

  • Written By: Published:
वाहनधारकांचं टेन्शन वाढलं! No PUC... No fuel, प्रताप सरनाईकांचे आदेश निघाले

Pratap Sarnaik On PUC Certificate : पीयुसी नसणाऱ्या वाहन धारकांसाठी एक मोठी आणि टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात नो पीयुसी नो फ्युएल योजनेची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिले आहेत. परिवहन आयुक्त कार्यालयात बैठक संपन्न झाली त्यावेळी सरनाईक यांनी वरील आदेश दिले आहेत.

राज्य सरकार चालवणार छावा राईड ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

प्रत्येक पेट्रोलपंपावर तपासला जाणार वाहन क्रमांक

राज्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला (स्कॅन करून) जाईल, जेणेकरून त्या माध्यमातून संबंधित वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) वैध आहे का नाही हे समजेल. जर, त्या वाहनाचे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिले जाणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल, जेणेकरून वाहन चालकाची गैरसोय होणार नाही. या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रला युनिक आयडेंटी (UID)असणार आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वेळोवेळी वैधता तपासणी केली जाऊ शकते.

पीयुसी प्रमाणपत्र देणाऱ्यांवरही उगारला जाणार बडगा

बैठकीला संबोधित करताना सरनाईक म्हणाले की, भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतःवर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे, त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर No PUC… No fuel योजनेची अंमलबजावणी सक्तीने राबवण्यात येणार आहे. त्याबरोबरच सध्या अवैध पद्धतीने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढणाऱ्या टोळीचा पडदाफाश करण्यासाठी परिवहन विभागाने धडक मोहीम राबवण्याच्या सूचना देखील सरनाईक यांनी केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube