पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांचा शनिवारवाड्यापुढे सत्कारच करायला हवा… : हरी नरकेंना दाखवला खाक्या

पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांचा शनिवारवाड्यापुढे सत्कारच करायला हवा… : हरी नरकेंना दाखवला खाक्या

Pune Trafic Police :  प्रा. हरी नरके हे एक ज्येष्ठ सामाजिक-राजकीय विश्लेषक आहेत. समाजातील अनेक प्रश्नांवर ते आपल्या भावना व्यक्त करत असतात. याचबरोबर ते सोशल मीडियावर देखील सक्रीय असतात. ते कायम आपली भूमिका या समाज माध्यामावर मांडत असतात. आज त्यांनी पुणे येथील पोलिसांच्या वागणुकीवरुन पोस्ट लिहली आहे. यामध्ये त्यांनी शेलक्या शब्दात पण थेटपणे ट्रॅफिक पोलिसांवर भाष्य केले आहे. ट्रॅफिक पोलिस कशाप्रकारे नागरिकांशी वागतात हे त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये लिहले आहे.

प्रा. हरी नरके यांची पोस्ट 

पुण्याच्या वाहतूक नियंत्रक पोलिसांचा खाक्या: प्रा. हरी नरके

वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडाला असताना तो नियंत्रित करता येत नाही म्हणून पुणे वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी दमदाटी करणे, अडवणूक करणे आणि निष्पाप प्रवाशांना त्रास देण्याचे उद्योग करण्यात मग्न असतात.

चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ

आज सकाळी ११.३० वा. स्वारगेट एस. टी.स्टँडवर पुस्तकांचे पार्सल घ्यायला गेलो होतो. चौकात तिथे पांढऱ्या गणवेशातील आठदहा वाहतूक पोलीस “वसुलीचे” काम करीत होते. तुफान ट्रॅफिक असताना तिला वाट करून देण्याऐवजी हे लोक भर रस्त्यात वाहने थांबवून मागील वाहनांना अधिक अडथळा निर्माण करीत होते. आमची गाडी बघून एक महिला कर्मचारी धावतच आडव्या आल्या. लायसन्स दाखवा असे फर्मान त्यांनी अत्यंत उर्मट आवाजात काढले. मागे गाड्यांची रांग लागलेली असताना बाई कुल होत्या.
आम्ही वाहतुकीचे नियम मोडून भयंकर गैरवर्तणूक केल्याचा आव त्यांनी आणला होता. आम्ही तर
अत्यंत शिस्तीत गाडी चालवलेली.

काय झाले? आमचे काही चुकले का? असे मी त्यांना विचारले असता माझे काम मला करू द्या, मध्ये बोलून सरकारी कामात अडथळा आणू नका. नाहीतर आत टाकीन असा बाईंनी दम दिला.
लायसन्स बघण्यापूर्वी त्यांनी app वरून इन्सुरंस, puc, सगळे ओके असल्याची खात्री करून घेतली. लायसन्स बघितले. बाई इतक्या संथपणे हे सारे करीत होत्या की त्यात बारा मिनिटे गेली. काहीच सापडले नाही म्हटल्यावर त्यांचा चेहरा पडला.

माझ्याशी डावपेच खेळू नका, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला फटकारले

सिनेमात डाकू लोक जसा चेहरा झाकून घेतात तसा त्यांनी झाकून घेतलेला असल्याने पूर्ण चेहरा दिसला नाही. पण वसुली करता येत नाही याचं अमाप दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
मी त्यांना परत विचारलं, काय झालं, आम्हाला का अडवले आहे? आमचा कामाचा खोळंबा होतोय. मागे ट्रॅफिक जाम झालीय. तुम्हाला आमची कोणती चूक दिसली?

त्यावर त्या म्हणाल्या, ज्यांच्याकडे लायसन्स नसते ते नियम पाळतात. तुम्ही नियम पाळत होता म्हणून लायसन्स नसणार यासाठी अडवले होते. मग आता? बाई चूप. जाऊ का आम्ही मग? असे विचारल्यावर सुतकातला चेहरा करीत त्या काहीतरी पुटपुटल्या. मग आम्ही ट्रॅफिक मधून कशीबशी वाट काढीत पुढे गेलो. बाई दुसऱ्या बकऱ्याकडे धावल्या.त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा हाच उद्योग सुरू होता.

https://letsupp.com/national/amit-shahs-big-statement-about-2024-lok-sabha-elections-33619.html

आम्ही नियमानुसार गाडी चालवली म्हणून त्यांना शंका आली. विशेष म्हणजे आमची सगळी कागदपत्रे व्यवस्थित असूनही बाईंनी दंड केला नाही, खोटा खटला भरला नाही, फक्त १५ मिनिटेच कामाचा खोळंबा केला नी कोणतीही लाच मागितली नाही. शाळा सोडल्याचे दाखले, आयकर भरल्याचा पुरावा, जिवंत असल्याचे लाईव्ह सर्टी फिकेट असे काहीही बाईंनी मागितले नाही. किती हा दयाळूपणा!यामुळे माझे डोळे भरून आले.

वाहतूक खात्यात सरसकट पैसे खातात, अतिशय भ्रष्ट लोक तिथे काम करतात असे मला अनेकांनी सांगितले होते. नियम पाळल्याबध्दल भर ट्रॅफिकमध्ये अडवणे, अत्यंत मुजोरीने बोलणे, सगळेच ठीक आहे म्हटल्यावर पैसे न मागता जाऊ देणे हे चित्र पाहून पुण्याच्या ट्रॅफिक खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचा शनिवारवाड्यापुढे जाहीर सत्कार करायला हवा असे मला वाटते. आपण काय सांगाल?

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube