माझ्याशी डावपेच खेळू नका, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला फटकारले
Chief Justice Chandrachud Fire On Lawyer Dont Play With Tricks : भारताचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे नेहमी आपल्या रोख ठोक स्वभावासाठी ओळखले जातात. जर वकील चुकत असतील ते त्यान्ना न्यायालयात फाटकारतात. काही दिवसापूर्वी डी.वाय.चंद्रचूड यांनी बार कौन्सिलच्या सुनावणी दरम्यान थेट वकिलाला सुनावले होते. आता पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे. एका वकिलाने सुनावणीच्या पुढच्या तारखेसाठी दुसऱ्या खंडपीठात अर्ज दाखल करू का? या वर त्या वकिलाला सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी चांगलेच फटकारले. ते म्हणाले लवकर तारखेसाठी अर्ज इतरत्र दाखल करण्याची धमकी मला देऊ नका. माझ्याशी डावपेच खेळू नका.
सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. वकिलाने खटल्याच्या सुनावणीसाठी लवकर तारखेची मागणी केली आणि सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, तुमची परवानगी असेल तर मी दुसऱ्या खंडपीठासमोर अर्ज दाखल करू का?
जेपीसीच्या मागणीवरून शरद पवारांचे घुमजाव! म्हणाले…
यावर सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड भडकले आणि त्यांनी याचिकाकर्त्याला फटकारले. ते म्हणाले माझ्याशी अशा युक्त्या खेळू नका. येथे अर्ज दाखल केल्यानंतर, लवकर तारखेसाठी तो इतरत्र दाखल करण्याची धमकी मला देऊ नका.
चंद्रकांत पाटलांना मनसेनं फटकारलं; दाखवला ‘तो’ व्हिडीओ
त्यावर वकील म्हणाले की मिलॉर्ड, मला माफ करा. तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले की, तुमची माफी मान्य आहे, पण माझ्या अधिकाराला आव्हान देण्याचा प्रयत्न करू नका. यासोबतच सरन्यायाधीशांनी सांगितले की, तुमच्या खटल्याच्या सुनावणीसाठी 17 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.