पाकिस्तानचा ३ वर्षांनंतर मायदेशात मालिका विजय; तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव

पाकिस्तानचा ३ वर्षांनंतर मायदेशात मालिका विजय; तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव

PAK vs ENG Test Series : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडचा ९ विकेट्सने पराभव केला. मायदेशात पाकिस्तानने तीन वर्षांनंतर मालिका विजय साकारला आहे. या सामन्यातील विजयासह पाकिस्तानने २-१ अशा फरकाने मालिकाही जिंकली. या सामन्यात साजीद खान आणि नोमान अली या दोघांनी चमकदार कामगिरी केली. साजिदने १० तर नोमानने ९ विकेट्स घेतल्या.

सामन्याच्या पहिल्या डावात साजिद खानने सहा विकेट्स घेतल्या. तर फलंदाजी करतानाही ४८ धावा केल्या. दुसऱ्या डावात साजिद खानने ४ विकेट घेतल्या. या व्यतिरिक्त नोमान अलीने पहिल्या डावात ३ विकेट्स घेतल्या. बॅटिंग करताना ४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात नोमानने ६ विकेट्स घेतल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube