Download App

पुणे महापालिकेचा यू-टर्न; निलेश राणेंची पावणेचार कोटींची थकबाकी 25 लाखात सेटल

  • Written By: Last Updated:

पुणे : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या डेक्कन परिसरात असलेल्या आर डेक्कन मॉलचा वरील भाग काल (दि. 28) मालमत्ता कर थकवल्याने सील केला होता. मात्र, कारवाईनंतर अवघ्या काही तासातचं पुणे महापालिकेने या कारवाईबाबत यू टर्न घेत तब्बल 3 कोटी 77 लाखांची थकबाकी चूकून पाठवल्याचे सांगत 25 लाखांच्या चेकवर सेटल केली आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे सर्व सामान्यांना एक न्याय आणि राजकीय नेत्यांच्या मुलांना एक न्याय असल्याचा कारभार अधोरेखित झाला आहे. (PMC Action On Narayan Rane Son Property In Pune)

महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे

तब्बल 3 कोटी 77 लाखांची रक्कम चुकून आकारली

निलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे चिरंजीव असून, डेक्कन परिसरातील आर डेक्कन हे निलेश राणेंच्या मालकीचे आहे. मालमत्त कर थकवल्याने काल पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या मॉलचा वरील भाग सील करण्यात आला होता. मात्र, कारवाईच्या अवघ्या काही तासातच राणेंना आकरण्यात आलेली रक्कम ही चकून पाठवण्यात आल्याचा खुलासा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. तसेच 25 लाखांच्या धनादेश मिळाल्यानंतर सील करण्यात आलेला मॉलचा वरील भाग खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या या दुट्टपी भूमिकेमुळे मात्र, हा यू टर्न राजकीय दबावामुळे घेण्यात आल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे.

Sanjay Raut : “मोदी खोटं बोलतात, शरद पवारांबाबत काय म्हणाले होते आठवा”; राऊतांनी दिली आठवण

कर थकवल्यानंतर सर्व सामान्यांच्या घरासमोर वाजवला जातो बँड

एकीकडे राजकीय दबावामुळे निलेश राणे यांच्यावरील करावाई अवघ्या 25 लाखात सेटल करण्यात आल्याची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. त्यामुळे मालमत्ता कर थकवल्यानंतर सर्व सामान्यांच्या घरासमोर बँड वाजवणारे पालिकेचे अधिकारी 25 लाखात कसे तयार झाले असा प्रश्न सर्व सामान्य पुणेकरांच्या मनात उपस्थित झाला आहे.

follow us