Nitin Gadkari : आपला देश अनेक समाजांनी मिळून बनलेला आहे. पण राजकारणाबद्दल माझे मत चांगले नाही. इथे फक्त ‘यूज अँड थ्रो’ केलं जाते. त्यामुळं पक्ष आणि संघटनेत माणूस म्हणून विचार करणं आवश्यक आहे, असं मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं.
मीरा बनली हेमा! ‘या’ चित्रपटात दिसणार हटके अंदाजात
पुण्यात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंत्री नितीन गडकरी, निवृत्त न्यायमुर्ती बी जे कोळसे पाटील, साहित्यिक इंद्रजित भालेराव उपस्थित होते. या कार्यक्रमाला संबोधित करतांना गडकरी म्हणाले की, समाजाबद्दलची आत्मियता आणि समाजाच्या विकासाची तळमळ खेडेकर यांच्यात आहे. राजकारणात प्रत्येकाला पद हवं असते, मला पद नको, असं कधी कुणी म्हणत नाही. पक्षाचा ठपका लागली की मर्यादा येतात. मात्र, खेडेकर यांनी कधीही राजकारणात येऊन पदाची अपेक्षा ठेवली नाही. तर लोकप्रतिनिधीपेक्षा मोठं काम त्यांनी केलं. समृध्द, संपन्न समाज निर्माण झाला पाहिजे, यासाठी ते कायम झटत राहिले, असं गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.
मराठा सेवा संघाच्या वाढीसाठी सर्वांनी आपल्या सोईनुसार योगदान द्या; पुरूषोत्तम खेडेकर
पुढं ते म्हणाले, हुशार असणं आणि यशस्वी असणं यात फरक आहे. कार्यक्षम असणं, प्रशासन समजने आणि ज्ञानी असणे यात फरक आहे. खेडेकर कार्यक्षम होते. प्रशासनात त्यांनी चांगलं काम केलं, असंही गडकरी म्हणाल.
ते म्हणाले, आपला देश अनेक समाजांनी मिळून तयार झालाय आणि त्यातील शेवटचा घटक आहे तो परिवार. आणि त्या परिवारातील महत्वाचा घटक आहे व्यक्ती. त्यामुळे समाज आणि देशाचा विकास करायचा असेल तर आधी कुटुंबांचा विकास करावा लागेल. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आले आणि मला देशसेवा करायची असं सांगू लागले. त्यांच किराणा दुकान होतं, व्यवसायात दिवाळं निघालेलं. घरी बायको आणि मुले होती. मी त्यांना म्हणालो, देशाला आणि राजकारणालाही तुमची गरज नाही. पहिले घर सांभाळलं पाहिजे आणि मग देश सेवेचा विचार करा. कारण राजकारणाबद्दल माझं मत काही चांगलं नाही, इथे फक्त युज अॅंड थ्रो केला जातो, असं गडकरी म्हणाले.
पक्ष आणि संघटनेत कार्यकर्त्यांचा माणूस म्हणून विचार करणे गरजेचे आहे. मी आणीबाणीच्या अनेक आंदोलनात सहभागी होतो. मात्र, माझ्याकडे जामीनासाठी 50 रुपये नसल्याने मी तुरुंगात गेलो. त्यावेळी कोणीही पैसे द्यायला तयार नव्हते. आज कळतं,जीवनात पैसा हे साध्य नाही, पण साधन आहे, असंही गडकरी म्हणाले.
माझ्या कार्यालतयात शिवरायांचा फोटो…
100 टक्के आदर्शांवर आधारित राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, मी माझ्या आई-वडिलांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना माझे आदर्श मानतो. त्यांनी आपल्या राजवटीत अनेक लढाया जिंकल्या पण एकही धार्मिक स्थळ उध्वस्त केले नाही, कोणावर अत्याचार केला नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे एकमेव राजे आहेत जे सर्व धर्मांप्रती समान होते. जर शिवाजी महाराज सेक्युलर असतील तर त्यांच्या इतका सेक्युलर कोणी झाला नाही. सेक्युलर याचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा नसून सर्व धर्म समभाव आहे. आज दिल्लीतील माझ्या कार्यालयात एकच फोटो आहे आणि तो म्हणजे शिवाजी महाराजांचा, असंही गडकरी म्हणाले.