मराठा सेवा संघाच्या वाढीसाठी सर्वांनी आपल्या सोईनुसार योगदान द्या; पुरूषोत्तम खेडेकर
75th birth anniversary of Yugnayak Purushottam Khedekar in Pune : पुण्यात युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सवीय अभिष्टचिंतन सोहळा आज पार पडला. मराठा सेवा संघ आणि युगनायक पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar) अमृत महोत्सव गौरव समितीकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरूषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जिजाऊंना अभिवादन करून पुरूषोत्तम खेडेकर यांनी त्यांच्या मनोगतास सुरूवात (Pune News) केली.
पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले की, आज 4 जानेवारी लुई ब्रेल यांची जयंती असते. त्यांनी जन्मजात अंधांना दृष्टी देण्यासाठी ब्रेल लिपी शोधली. मराठा सेवा संघाने अतिशय खडतर काम केलंय. मराठा सेवा संघाने (Maratha Seva Sangh) डोळे असूनही अंधाळे झालेल्यांना दृष्टी देण्याचं काम केलं. आज माझा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल आभार मानतो. कार्यक्रमाला गडकरी साहेब यावेत, अशी एकमेव मागणी होती. माझ्या या जीवनकालात अनेक चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडल्या आहेत, असं खेडेकर म्हणाले. या गोष्टी शून्यांचा ताळमेळ या पुस्तकात नमूद केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
मोठी बातमी! बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेंसह तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
मला इथपर्यंत येण्यात आईवडिलांनंतर सर्वात जास्त सहभाग माझ्या बायकोचा आहे, असं देखील पुरूषोत्तम खेडेकर यांनी स्पष्ट केलंय. मी गावातच शिकलो. नंतर चिखलीला गेलो. नागपूरमधून इंजिनिअर झालो. आईवडिलांनी मला इंजिनिअर केलं, त्यांची दृष्टी आज हरवलेली आहे. माझ्या 36 वर्षांच्या काळात 22-23 बदल्या झाल्यात. कारण एकच होतं की, व्यावहारिक आदर्शावर भर दिल्यामुळे जगण्यात अनेक अडचणी आल्यात. मराठा सेवा संघाचा एक पदाधिकारी आहे. मी अत्यंत कार्यक्षम कार्यकारी अभियंता आहे.
बेरोजगार फिरणाऱ्या मुलांनी घरपोच रजिस्ट्रेशन पोहोचवलं. बायकोची नटण्या-मुरडण्याची हौस पूर्ण करता आली नाही. परंतु आता नंतर ते सर्व पूर्ण करतोय. मी एमपीएससी पास असून देखील रजिस्टर मॅरेज केलं. मला तीन मुलं आहेत. सार्वजनिक जीवनात काही ना काही बाबी सर्वजण करत असतो. मराठा सेवा संघ एनजीओसारखं काम करतो. त्यात तेहतीस कक्ष निर्माण झालेत. चांगलं काम करत असताना अचानक त्याला वेगळं रूप येतं. अनेक वर्ष मराठा सेवा संघाकडे दुर्लक्ष झालंय.
सुदर्शन घुले : हिंदी सिनेमातील स्क्रिप्टलाही लाजवेल असा ‘मोस्ट वाँटेड आरोपी’
आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत आता साडेबारा हजार मुलं यात शिकत आहे. संघाच्या माध्यमातून अनेकांना सहकार्य केलंय. संशोधन केंद्र स्थापन करता येतील, असं देखील पुरूषोत्तम खेडेकर म्हणाले आहेत. सगळ्या सरकारकडे मागितले, पण पहिल्या रकमेत एक कोटी रूपये गडकरी साहेबांच्या काळात मिळाले. 1986 पासून आम्ही पवारांसाहेब होतो, पण काही झालं नाही असं देखील खेडेकर म्हणालेत. मी चांगली कामं करू शकलो, कारण मला त्यावेळी मुख्यमंत्री चांगले भेटले. कामाच्या भागात कुठेही मी कमी नव्हतो. मराठा सेवा संघासाठी मी जी नोकरी करत होतो, तेव्हा मी शनिवारी बाहेर पडायचो, ते थेट सोमवारी दुपारी यायचो, असं देखील ते म्हणालेत.
आज अमृतमहोत्सव साजरा करत केला जातोय. पंचाहत्तरी साजरी करणं म्हणजे बाल्यावस्थेत आहे, असं देखील पुरूषोत्तम खेडेकर म्हणालेत. आतापर्यंत आपला सर्वांचा जो सहवास लाभला, भविष्यात तो असेल. मराठा सेवा संघाच्या भारत देशातील सर्व क्रेंदशासित प्रदेशांसह राज्यांत शाखा आहे. भविष्यात मराठा सेवा संघाच्या वाढीसाठी सर्वांनी आपल्या सोईनुसार योगदान द्यावे, अशी विनंती पुरूषोत्तम खेडेकर यांनी केलीय.