आता LPG ऐवजी हा गॅस वापरता येणार! गॅस तुटवड्या दरम्यान पुण्यातील शस्त्रज्ञांचा मोठा दावा

LPG Pune chemists तब्बल 20 वर्षांच्या संशोधनानंतर पुण्यातील संशोधकांनी दावा केला आहे. की, एलपीजी गॅल पर्याय सापडला आहे.

LPG Pune's Chemists

LPG Pune's Chemists

Now this gas can used instead of LPG Pune’s chemists make a big claim amid gas shortage : युद्ध जरी इराण विरूद्ध इस्त्रायल अमेरिका यांच्यात सुरू असलं तरी अनेक देश वेठीस धरले गेले आहेत. भारतात इंधनापासून ते उद्योग, शेती, हॉटेल व्यवसाय अन् थेट स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस या सर्वांना या युद्धाच्या झळा पोहचत आहेत. दुसरीकडे स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी गॅसचा मात्र तुटवडा असल्याने सरकारकडून कमर्शिअल गॅस वितरण थांबवण्यात आलयं, घरगुती गॅसच्या बुकिंगचे दिवस वाढवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांना गॅस काटकसरीने वापराचे आवाहन केलं आहे. मात्र यामध्ये एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे तब्बल 20 वर्षांच्या संशोधनानंतर पुण्यातील संशोधकांनी दावा केला आहे. की, एलपीजी गॅल पर्याय सापडला आहे.

सद्दामसारखं संपवायला आले अन् स्वतःच अडकले! जनरल जाफरींनी रचलेलं ते ‘चक्रव्यूह’ काय आहे?

पुण्यातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मधील शास्त्रज्ञ डॉक्टर तिरुमलाईवामी राजा आणि त्यांची टीम गेल्या वीस वर्षांपासून संशोधन करत आहे. त्यानंतर त्यांनी आता प्रयोगशाळेत गॅस तयार करण्यासाठी लागणारे उत्प्रेरक तयार करण्यात यश मिळवलं आहे. यातून डीएमई म्हणजेच डायमिथाईल इथर हा गॅस निर्माण करण्यात आला आहे. जो व्यावसायिक वापरासाठी वापरला जाऊ शकतो.

ॲमेझॉन MGM स्टुडिओजच्या नव्या ‘रफ्तार’ चित्रपटाची घोषणा; राजकुमार राव आणि कीर्ती सुरेश पहिल्यांदाच एकत्र

सध्या या ग्रसचावापर पायलट प्रोजेक्टमध्ये केला जात आहे. त्यासाठी त्याचे दररोज अडीचशे किलोच्या प्रमाणात उत्पादन केले जात आहे. तसेच औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास हा गॅस एलपीजी गॅसमध्ये आठ टक्के इतक्या प्रमाणात मिसळता येणार आहे. ज्यामुळे इंधनासाठी इतर देशांवर असलेल्या अवलंबनाचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. असा दावा या शास्त्रज्ञाने केला आहे.

डीएमई गॅसचं वैशिष्ट काय?

त्याचबरोबर या शास्त्रज्ञांनी असा देखील दावा केला आहे की, हा गॅस एलपीजी पेक्षा स्वस्त असेल तसेच हा गॅस भारतीय बनावटीच्या उत्प्रेरकांपासून तयार करण्यात आला आहे. एलपीजी पेक्षा हा गॅस शुद्ध असेल. या गॅसची फ्लेम पारदर्शक असते. त्यामुळे हा गॅस पर्यावरण पुरक ठरतो. त्याचबरोबर एलपीजी प्रमाणे हा गॅस स्वतंत्र देखील वापरता येतो आणि एलपीजीमध्ये आठ टक्के मिसळून देखील याचा वापर करता येतो.

Exit mobile version