प्रेमानंद महाराजांच्या भेटीवर विराटच्या टीमचा मोठा खुलासा! फलाहरी महाराजांच्या 5 कोटींच्या दाव्यावर काय म्हणाले?
Sant Premanand Maharaj यांच्या आश्रमात विराट कोहलीला 5 कोटी रुपये देऊन बोलावण्यात आल्याच्या दाव्यावर विराटच्या टीमने खुलास केला
Sant Premanand Maharaj Dinesh Sharma Falahari Baba Virat Kohli Team claim denied : संत प्रेमानंद महाराज (Sant Premanand Maharaj) यांच्या वृंदावन येथील आश्रमात साधक रसिक दुलारी यांच्या मृत्यू झाला आहे. त्यावरून वाद सुरू असतानाच श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष फलाहारी महाराज (Dinesh Sharma-Falahari Baba) यांनी पत्र लिहून आश्रमाशी संबंधित विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विराट कोहली (Virat Kohli) यांना 5 कोटी रुपये देऊन आश्रमात बोलावण्यात आले होते आणि त्यातून प्रेमानंद महाराजांना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा फलाहारी महाराज यांनी केला होता. त्यावर आता विराट कोहलीच्या टीमने मोठा दावा केला आहे.
प्रेमानंद महाराजांच्या भेटीवर विराटच्या टीमचा मोठा खुलासा!
विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी क्रिकेटपटूला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट देण्यासाठी 5 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा फेटाळून लावला आहे. हा आरोप खोटा, निराधार आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वृंदावन येथील आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली होती. मात्र, या भेटीसाठी कोहलीला 5 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आता कोहलीच्या प्रवक्त्यांनी या दाव्याचे खंडन केले आहे.
‘दृश्यम द कन्क्लूजन’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, अवघ्या 5 दिवसांत 337.35 कोटींची जगभरात कमाई
‘फलाहारी महाराज’ म्हणून प्रसिद्ध असलेले दिनेश शर्मा यांनी केलेल्या आरोपानंतर हे प्रकरण चर्चेत आले. त्यांच्या या दाव्याची चर्चा माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर झाली. दिनेश शर्मा हे श्री कृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दावा केला होता की, विराट कोहलीला प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात आणण्यासाठी 5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, विराट कोहलीच्या प्रवक्त्यांनी हा दावा स्पष्टपणे फेटाळत तो खोटा, निराधार आणि तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे.