Download App

NSUI च्या कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस भवनात राडा, विद्यार्थ्यी प्रदेशांकडून जिल्हा उपाध्यक्षाला लाथाबुक्यांनी मारहाण

  • Written By: Last Updated:

congress internal dispute : काँग्रेसशी (Congress) संलग्न विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ काँग्रेसच्या (एनएसयूआय) कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी दुपारी काँग्रेस भवनात (Congress Bhavan) जोरदार राडा झाला. गेल्या काही महिन्यांपासून एनएसयूआयच्या शहराध्यक्षपदाचा वाद सुरू आहे. दरम्यान, -बाबत पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Grammy Awards जाहीर! शंकर महादेवन, झाकीर हुसेन यांनी उमटवली ग्रॅमीवर मोहोर, संगीतप्रेमींकडून कौतुकाचा वर्षाव 

पुणे शहर काँग्रेस कमेटीमधील ज्येष्ठ नेत्यांमधील अंतर्गत वाद हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. याचा फटका देखील शहर काँग्रेसला बसलेला आहे. आता ज्येष्ठांच्या बरोबर विद्यार्थी काँग्रेसमधील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थी प्रदेशाध्यक्षांनेच विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाला बेदम मारहाण केली. याबाबत पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रफुल संभाजी पिसाळ (Praful Sambhaji Pisal) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, काँग्रेसचे विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख (Amir Sheikh), भूषण रानभरे, युवराज नायडू आणि राज जाधव यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्रासह 13 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, IMD चा इशारा 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार प्रफुल पिसाळ हे विद्यार्थी काँग्रेस संघटनेचं 3 वर्षापासून काम करत आहेत. ते सध्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. तर विद्यार्थी संघटनेचे अभिजीत गोरे हे अध्यक्ष आहेत. तर अमिर शेख हे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अभिजीत गोरे यांना जिल्ह्यामधील संघटनेचे पदे नियुक्त करण्याचे अधिकार आहेत. मात्र, संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अभिजीत गोरे यांच्या ऐवजी प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व कोथरूड विभागाचे माजी अध्यक्ष राज जाधव यांनी भारती विद्यापीठ कॅम्पस, कोथरुडचे अध्यक्षपद थोरात या विदयार्थ्याला दिले. दरम्यान, याच पदावरून गोरे आणि शेख यांच्यात वाद झाले.

3 फेब्रुवारी रोजी तक्रारदार हे काँग्रेस भवन येथे गेले होते. त्यावेळी अमिर शेख हे 30-40 कार्यकत्यासह उपस्थित होते्. अमिर शेख हा शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचे केबीनमध्ये बसलेले होते. तेव्हा तक्रारदार यांनी अमिर शेख यांना भेटून मिटवून घ्या, असं सांगितलं. यावेळी शेख आणि पिसाळ यांच्यात वाद झाला. तुम्ही वकीलपत्र घेवून आला का, असं म्हणत शिवीगाळ केली.

काँग्रेस भवनच्या बाहेर तुम्ही गोरेला बोलवा, तुम्हाला सोडणार नाही. त्यांच्या घरी घेवून चला, असं शेख तक्रारदार पिसाळ यांना म्हणाले. तेव्हा मला त्यांचं घर माहीत नाही असं तक्रारदार यांनी सांगितल. तेव्हा तेथे हजर असलेला युवराज नायडु याने आपल्या हातातील कडे काढून पिसाळ याच्या डोक्यात मारले. राज जाधव याने हाताने तोंडावर मारहाण केली. प्रदेशाध्यक्ष अमिर शेख यांनी लाथांनी छातीवर मारहाण केली. भुषण रानभरे याने विटाने पाठीवर मारहाण करत धमकी दिली, असं तक्रारीत म्हटलं आहे. यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बरोबर 4 जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

follow us

संबंधित बातम्या