Download App

ब्रेकिंग : आक्षेपार्ह पोस्टवरून यवतमध्ये दोन गट भिडले; पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या

  • Written By: Last Updated:

Communal Violence In Daund Yavat After Objectionable Whatsapp Post : व्हॉट्सअपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून दौंडच्या यवतमध्ये दोन गट भिडलयाचे वृत्त समोर आले असून, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत दौंडचे आमदार राहुल कूल यांची प्रतिक्रिया समोर आली असून, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तणावाची परिस्थिती होती. तणाव निवळावा यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, आज दोन गट भिडल्याने यवतमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर, दुसरीकडे, पवार गटाचे आमदारा जितेंद्र आव्हाड यांनी ज्या भागात कधीच जातीय तणाव झाले नाही, अशा भागांमध्ये तणाव पेटवला जात आहे. स्वतःच्या राजकीय हितासाठी सर्व महाराष्ट्रातील वातावरण दुषित करण्याचे काम सुरू असून हे निंदनीय आहे.

गावातील काही तरूणांकडून दगडफेकीचे प्रकार

एकीकडे आक्षेपार्ह पोस्टवरून तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना, दुसरीकडे गावातील काही तरूणांकडून धार्मिक स्थळांवर दगडफेक करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. काल यवतमध्ये पडळकर आणि संग्राम जगताप यांची सभा पार पडली होती. त्यानंतप दुसऱ्याच दिवशी दोनगट आमने सामने भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी येथील नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतरदेखील गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

शांतता राखण्याचे आवाहन

गावातील वाढता तणाव लक्षात घेता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सदर प्रकार अत्यंत गंभीर असून कोणताही अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकारी, यवत पोलीस ठाणे यांनी केले आहे.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी (दि. १) सकाळी यवतमधील एका युवकाने व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली. या घटनेनंतर काही तासांतच दुपारी १२ वाजेनंतर यवतचा आठवडे बाजार बंद करण्यात आला. यवतमध्ये यापूर्वा २६जुलै रोजी नीलकंठेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेचा संताप अद्याप शमलेला नसतानाच, अवघ्या कही दिवसांतच दुसरा वादग्रस्त प्रकार घडल्याने वातावरण आणखी पेटले आहे.

follow us