Pune Crime : कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू…

Pune Crime : कुत्रा मागे लागल्यामुळे बचाव करण्यासाठी पाळतांना तिसऱ्या मजल्यावर खाली पडून रमेश गायकवाड (वय 45) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Pune Crime

Pune Crime

Pune Crime : कुत्रा मागे लागल्यामुळे बचाव करण्यासाठी पाळतांना तिसऱ्या मजल्यावर खाली पडून रमेश गायकवाड (वय 45) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील कसबा पेठ येथे घडली आहे. याप्रकरणी कुत्र्याचा मालक सिद्धार्थ दिलीप कांबळे (वय 24, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट कसबा पेठ पुणे) याच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची पत्नी जया रमेश गायकवाड (वय 40) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी अधिकची माहिती अशी की, रमेश गायकवाड हे इलेक्ट्रिशियनची कामे करत होते. 1 ऑक्टोबर रोजी ते इलेक्ट्रिशियनच काम करण्यासाठीच कसबा पेठेतील सिद्धिविनायक अपार्टमेंटमध्ये एका सहकाऱ्यासोबत आले होते. ते तिसऱ्या मजल्यावर असतानाच चौथ्या मजल्यावर सिद्धार्थ कांबळे यांचा कुत्रा त्यांच्या मागे लागला. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी घाबरलेले रमेश गायकवाड हे जिन्यावरून पळत जात असताना डक्टमधून खाली पडले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

रमेश गायकवाड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आरोपी सिद्धार्थ कांबळे याने कुत्रा पाळण्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गोरे अधिक तपास करत आहेत.

Bahar Nava : नव्या नात्यातील दरवळ खुलवणारा ‘बहर नवा’, ‘असंभव’ मधील नवीन गाणं प्रदर्शित

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून भटक्या आणि पाळीव कुत्र्यांच्या तक्रारी सामान्य नागरिक करत आहेत. त्यावर पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता तर कुत्र्यापासून बचाव करतांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पाळीव प्राण्यांना पाळण्याच्या सहितेच पालन न करणारांवर प्रशासन कारवाई करणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

Exit mobile version