Download App

Ajit Pawar : सरकारने रडीचा डाव थांबवला पाहिजे

पुणे : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister) राज्यातील महागाई, बेरोजगारी अशा समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. चार दिवसांपूर्वी एका पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच दुर्दैवी निधन झालं. मधल्या काळात आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर हल्ला झाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा जो रडीचा डाव चालू आहे तो सरकारने थांबवला पाहिजे’, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

पुढं बोलताना अजित पवार म्हणाले, ‘वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीने लढा. आम्ही काही मत मांडलं तर त्याला वाटलंच तर जाहीर सभेत उत्तर द्या. अशाप्रकारे तुम्ही पत्रकारांना संपवणार असाल, विरोधी पक्षांच्या आमदारांवर हल्ला करणार असाल, युवा नेत्यांवर हल्ला करत असाल तर तुम्ही चुका करीत आहात. महाराष्ट्रातील जनतेला हे कधीही आवडणार नाही. ही रियाक्शन विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.

राज्यपाल कोश्यारी राजीनाम्यावर खा. विखे म्हणाले, ‘कोश्यारींचा राजीनामा ही…’

पोहरादेवीला अडीचशे कोटींचा निधीची घोषणा करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ज्यांनी निधी दिला नाही त्यांना घरी बसवले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘हे राजकारण आहे. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, मधल्या काळात भूविकास बॅकेचे कर्जमाफ केलं. ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी केल्या. आमचं सरकार गेल्याने बजेटमध्ये सांगितलेल्या गोष्टी करता आल्या नाहीत. महाराष्ट्राला माहिती आहे आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी करतो. आता त्यांचे सरकार आहे ते त्यांनी करावं’, असे अजित पवार म्हणाले.

राज्यपालांचा राजीनामा मंजूर झालेला आहे. त्यांनी तो मागेच दिला होता. तो मंजूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. केंद्राने अनेक महत्वाच्या राज्यातील राज्यपालांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये आपल्या राज्यात देखील नवीन राज्यपाल नेमले आहेत. यापूर्वी त्यांनी 1998 मध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं आहे. ते आता आपल्या राज्याची सुत्रे घेतील. चांगल्याप्रकारे आपली कारकीर्द पुर्णत्वास घेऊन जातील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

follow us