Organization of a lecture on ‘Katha Krantichi’ : ऑगस्ट क्रांती दिना निमित्त आज पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कडून इतिहास स्वातंत्र्य चळवळीचा कथाक्रांतीच्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले, प्रसिद्ध व्याख्याते डॉ.दिलीप गरुड यांनी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक स्वातंत्र्यवीरांच्या कथा, कहाण्या, वीरगाथा सांगत उपस्थितांना प्रेरित केले. पिंपरी चौकातील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्याना मध्ये डॉ. दिलीप गरुड म्हणाले, “गांधी मार्ग हेच आजच्या परिस्थितीवर उत्तर आहे जगात क्रांती आणि सलोखा राखून बंधू भावाने जगायचे असेल तर गांधी विचारानुसार वाटचाल करावी लागेल, तरच जगात शांतता राहील.
आजचा माणूस भ्रष्ट व मूल्यहीन जीवन पद्धतीकडे ओढला जात आहे, मतदानाच्या दिवशी माणसं उत्स्फूर्तपणे बाहेर पडत नाहीत, ती पैशासाठी घरी वाट बघत बसतात, ही लोकशाहीची अधोगती आहे. म्हणून माणसाला नीतिमत्तेबरोबरच, तत्त्वनिष्ठता व संस्कारशीलतेची जोड दिल्यास तो स्वाभिमानाने पुन्हा उभा राहील” असे विचार क्रांती दिनाच्या निमित्ताने डॉ दिलीप गरुड यांनी मांडले.
देशाच्या क्रांतीचा, स्वातंत्र्य चळवळीचा, स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा विसर पडत चाललेल्या आजच्या युवा पिढीला मार्गदर्शक, दिशादर्शक, कार्यदर्शक प्रेरक असा क्रांतीचा इतिहास समजला जावा, या दृष्टीने आजच्या क्रांतीदिनी इतिहास स्वतंत्र चळवळीचा कथा क्रांतीच्या या व्याख्यानाचा आयोजन केले आहे, आजची सर्व स्तरात अपयशी ठरलेली राजकीय राजवट पाहता, शेतकरी विद्यार्थी कर्मचारी कामगार महिला उद्योजक सर्वांचेच पिळवणूक करणारी ही सत्ता बदलवून पुन्हा एकदा संविधान स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल,अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहे.
धीरज परदेशी मृत्यू प्रकरणाने अहिल्यानगर पेटले; शहर बंद, रुग्णालयाबाहेर आंदोलन, आरोपींच्या अटकेची मागणी
अशी लढाई लढायला देशाच्या क्रांतिकारकांचा इतिहास देशवासीयांपुढे मोलाची भूमिका बजावेल, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते परिमल घुले, मनसेच्या महिला नेत्या अनिता सोनवणे, बहुजन वंचित आघाडीच्या नेत्या अनिता सावळे यांनी आज क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि तात्कालीन स्वातंत्र्यवीरांच्या कथा ऐकून उपस्थित काँग्रेस जणांनी त्यास उत्तम प्रतिसाद आणि दाद दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, व्याख्याते डॉ. दिलीप गरुड, गांधीवादी विचारवंत बी.आर. माडगूळकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सेवादलाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग जगताप, छावा मराठा युवा महासंघाचे अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण कदम, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, निवृत्ती सैनिक राजेश कुमार पाटील, मेहबूब इनामदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
