‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस तर्फे आयोजन

27 सप्टेंबर 2026 रोजी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Untitled Design   2026 09 23T204705.931

Untitled Design 2026 09 23T204705.931

Organized by Green World and Jadhavar Group of Institutes : ग्रीन वर्ल्ड आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी रविवार, दि.27 सप्टेंबर 2026 रोजी ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर आणि आयोजक व लेखक गौतम कोतवाल यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळा नऱ्हे येथील ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर, शैक्षणिक संकुल क्रमांक २ येथे होणार आहेत. ‘गौरव कर्तृत्वाचा’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात शिक्षण, उद्योग, सामाजिक कार्य, बँकिंग, कृषी, प्रशासन आणि विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने रविवार, 27 सप्टेंबर 2026 रोजी तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता होणाऱ्या प्रथम सत्रात मंत्रालय सचिव विकास देशमुख, ऊर्जा कुतवळ फूड प्रॉडक्ट्स चे प्रकाश कुतवळ, प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर आणि माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

अंतर्गत आक्षेप, SIR आणि निर्णय प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, अंतिम निर्णय सर्वसंमतीने

या सत्रात ‘ग्रीन वर्ल्ड, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्काराने नवनाथ ढवळे, जयश्री पलांडे आणि डॉ. शिवाजीराव पोखरकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने विजय कोद्रे आणि अनिल तुपे यांना गौरविण्यात येणार आहे.

दुसरे सत्र दुपारी 1.30 वाजता असून या कार्यक्रमाला जमाबंदी व संचालक भूमी अभिलेख अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, कृषी उद्योजक व कृषी आणि कृषी संलग्न अभ्यासाचे प्रसारक उदय बोरावके, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात श्रीरामपूर रयत शैक्षणिक संकुल प्रमुख मीना जगधने यांचा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अभिजित भुजबळ, अशोक जाधव, तसेच सुधीर मुंगसे यांचाही आयकॉनिक लीडर ऑफ द महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, वकिलांकडून अखेर उत्तर

तिसऱ्या सत्रात सायंकाळी 5 वाजता इन्कमटॅक्स कमिशनर आयआरएस अजय केसरी , माधुरी सोलरचे चेअरमन संजय देशमुख, नगरसेविका निवेदिता एकबोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या सत्रात ‘आयकॉनिक लीडर ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने श्रीधर गायकवाड, डॉ. नुसरत गुलझार आणि उमेश पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तर ‘ग्रीन वर्ल्ड, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न’ पुरस्काराने मिलिंद शहा आणि डॉ. कैलास चौधरी यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version