श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन सोहळ्याची रूपरेषा जाहीर

सुवर्णगणेश धामातून सकाळी 8 वाजता प्रस्थान; सायंकाळी 6 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणूक मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्याची परंपरा

Untitled Design   2026 09 23T184710.079

Untitled Design 2026 09 23T184710.079

Outline of the immersion ceremony announced : गणेशोत्सवाच्या सांगता सोहळ्याची तयारी सुरू झाली असून, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरवणुकीची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. सकाळी सुवर्णगणेश धाम येथे पूजाविधी, त्यानंतर रथातून मंडईतील टिळक पुतळ्याकडे प्रस्थान आणि सायंकाळी 6 वाजता मंडईतून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता श्री सुवर्णगणेश धाम येथे श्रींची अनंत चतुर्दशी पूजा संपन्न होईल. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, तसेच झोन 1 पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या सपत्नीक उपस्थितीत पूजाविधी पार पडणार आहे. पूजेनंतर सकाळी 8 वाजता श्री विघ्नहर्ता रथातून श्रींची मूर्ती सुवर्णगणेश धाम येथून मंडईतील टिळक पुतळ्याकडे विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होईल.

शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार
पुण्याच्या गणेशोत्सवातील प्रथा आणि परंपरेनुसार टिळक पुतळा येथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यानंतर पोलिस प्रशासनाने निश्चित केलेल्या वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता मंडई येथून भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होईल.

पुण्याच्या गणेशोत्सवाला लाभलेली समृद्ध परंपरा आणि संस्कृती जपत यंदाचा विसर्जन सोहळा भक्तिभावाने व उत्साहात पार पडावा, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होताना मिरवणुकीत शिस्त व शांतता राखावी. पर्यावरणाचे भान ठेवून पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सर्व गणेशभक्तांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाची सांगता करावी.” असं यावेळी उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितलं.

Exit mobile version