Download App

Sandip Satav : साडेतीन हजारांची कमाई ते दोन हजार कोटींची उलाढाल करणारा मराठमोळा पुणेकर

  • Written By: Last Updated:

Oxy Buildcorp Sandip Satav Business Journey :  पुण्यातील उच्च भ्रू परिसर त्या ठिकाणी डोळ्यांना दिसणाऱ्या गगनचुंबी इमारती पण या इमारती कुणी मारवाडी गुजराती व्यक्तीने उभारलेल्या नसून, एका मराठी व्यक्तीने उभारल्या आहेत. अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन अवघे साडे तीन हजार कमावणाऱ्या ‘ऑक्सी बिल्डकॉर्प’ चे सर्वेसर्वा संदीप सातव यांची ही कहाणी. कधीकाळी महिन्याला काही हजार कमावणारे सातव आज वर्षाला थोडे थोडके नव्हे तर, तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल करतात. त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता? याचा उलगडा सातव यांनी ‘लेट्सअप’ मराठीच्या ‘बिझनेस महाराजा’ मध्ये मनमोकळ्या गप्पांदरम्यान केला आहे.

Exclusive : रोहित पवार कसे झाले सतीश मगर यांचे जावई? स्वतः सासऱ्यांनीच सांगितला किस्सा

संदीप सातव दिसायला तशी जेमतेम पर्सनॅलीटीचं. शिक्षण विचारलं तर, अभियांत्रिकी पण काम इमारती बांधण्याचं. साधारण मेकॅनिकलचे शिक्षण घेतलेली व्यक्ती आपल्याला हात काळे करताना कुठे तरी काहीतरी जुगाड करताना दिसून येते. हे सगळे प्रकार सातव यांनीदेखील केले. पण, पार्ट टाईम म्हणून बांधकाम व्यवसायात उतरलेले आणि गुणवत्ता आणि चिकाटीच्या जोरावर पार्ट टाईम व्यवसाय आज पूर्णवेळ अतिशय उत्तमपणे चालवत आहेत.

Exclusive : तो शब्द खटकला अन् सतीश मगर यांनी मगरपट्टा सिटी निर्माण केली

सातव त्यांच्या एकूण प्रवासाविषयी बोलताना म्हणाले की, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मीदेखील सर्वांसारखी नोकरी केली. प्लेसमेंटमधून माझी L & T सारख्या नामांकित कंपनीसाठी मुंबईत निवड झाली. त्यावेळी माझा पगार अवघा साडे तीन हजार रुपये होता. पण, मुंबई काही मला आपलीशी वाटली नाही. त्यामुळे राम राम करत मी पुन्हा पुणे गाठलं. पुण्यात आल्यानंतर मी बजाजमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली.

नोकरी होती पण प्रसिद्धी नव्हती

सातव पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पहिली नोकरी केली. त्यावेळी व्यवसाय करावा असा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता. पण, पहिला पगार साडे तीन हजार मग त्यानंतर पगार वाढ झाली. पण वाढीचा स्पीड बघता आणि मिळणारं समाधान यात बरीच तफावत होती. काम करूनही प्रसिद्धी नव्हती. त्यामुळे पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारं क्षेत्र असलेल्या रिअल इस्टेट व्यवसाय पार्ट टाईम करायचं मनावर घेतलं. पुढे नशीबाची साथ आणि कष्टाच्या जोरावर आज ऑक्सी बिल्डकॉर्पची वार्षिक उलाढाल तब्बल दोन हजार कोटींमध्ये गेल्याचे सातव आनंदाने सांगतात.

अन् बांधकाम व्यवसायात झाली एन्ट्री

2002 ते 2010 पर्यंत सुरू केलेलं युनिट व्यवस्थित सुरू होतं. याच काळात नगर रोडवर एखादा प्रोजेकट मिळतोय का याची विचारणा पत्नीच्या नातेवाईकांकडून झाली. त्यावेळी पहिला प्लॉट दोन एकरचा मिळाला. याठिकाणी आम्ही 200 फ्लॅट्सची स्किम काढली. दोन एकरात पहिला प्रोजेक्ट सुरू करायचं ठरलं त्यावेळी आम्ही एक कोटींची रक्कम उभी केली. हा सगळा पैसा साईटवर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लावल्याचे सातव म्हणाले. या सगळ्यामध्ये वाघोलीतील पहिल्या प्रोजेक्टमध्ये  परिचयातील डॉ. अनिश अग्रवाल यांनी भांडवलं दिल्याने आयुष्यातील पहिला प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण झाला. पण अग्रवाल यांनी दिलेल्या भांडवलाच्या बदल्यात मी त्यांना ना नफा ना तोटा या तत्त्वावर तीन प्लॅट दिल्याची आठवण सातव यांनी यावेळी उलगडली.

ब्रँड तयार झाला पण अनेकांना नाही सांगावं लागलं

आमचा पहिला प्रोजेक्ट हा वाघोलीतील बकोरी डोंगराच्या पायथ्याची होता. त्यामुळे आम्ही या प्रोजेक्टला ‘ऑक्सी व्हॅली’ असं नाव देण्याचं निश्चित केलं. त्यानंतर दुसरा प्रोजेक्टही याच भागात मिळाला. काम आणि गुणवत्ता पाहून अनेक प्रोजेक्ट करण्याची विचारणा झाली पण, कमावलेलं नाव टिकवून ठेवण्यासाठी आम्ही हातात घेतलेला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय नवीन बांधकाम सुरू करण्याचं ठरवलं आणि अनेक नवीन प्रोजेक्ट घेण्यासाठी नकार देण्यास सुरूवात केली. पण त्यानंतरही आमच्या जागांवर तुम्हीच बांधकाम करायचं असा आग्रह अनेक जागा मालकांचा होता आणि त्यासाठी ते हातातील काम होईपर्यंत थांबल्याचेही सातव म्हणाले. हे केवळ आणि केवळ आम्ही देत असलेली गुणवत्ता आणि कमावलेलं नाव यामुळे शक्य झाल्याचे सातव म्हणाले.

एकवेळ काम भरपूर मिळतील पण खराब झालेलं नाव परत मिळत नाही. त्यामुळेच आम्ही हाती घेतलेलं प्रोजेक्ट पूर्ण करूनचं नव्या प्रोजेक्टची पायाभरणी करण्याचा नियम स्वतःला लावून घेतला आहे. सातव यांच्या या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या परिवारातील सदस्यांनी पूर्ण साथ दिली. आज सातव यांची मुलगी परदेशात उच्च शिक्षण घेत असून, आपल्या मुलांनी सध्याच्या चालू व्यवसायात येण्यापूर्वी एखाद्या ठिकाणी नोकरी करून गाठिशी अनुभव घ्यावा आणि त्यांना आवडतं त्या क्षेत्रात काम करावं असा सल्ला दिला आहे.

follow us