पद्मश्री आचार्या श्री चंदनाजी (ताई माँ) यांचं आज बुधवार (दि. २२ एप्रिल) रोजी सकाळी १०:५० वाजता पुणे येथे निर्वाण (निधन) झालं आहे. शुक्रवार (दि. २४ एप्रिल)रोजी सायं ५:०० वाजता येथील वैकुंठ श्मशानभूमी येथे अंतिम संस्कार होणार आहेत.
कोण होत्या आचार्य चंदनाजी?
आचार्य चंदनाजी या जैन धर्मातील ‘आचार्य’ पदवी मिळवणाऱ्या पहिल्या साध्वी होत्या. त्यांना २०२२ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांनी ‘वीरयतन’ या ना-नफा संस्थेची स्थापना केली होती, जी मानवतावादी कार्यासाठी ओळखली जाते.
