Panchayat Samiti Eletion: पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसेने (ncp) वर्चस्व मिळविले आहे. सोमवारी जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती निवडले गेले आहेत. दहा पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती झाले आहेत. तर आठ उपसभापती झाले आहेत. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने शिंदेसनेला उपसभापतीपद दिले आहे. तर भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या वेल्हे, मुळशी, भोर तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सभापती, उपसभापती झाले आहेत. दौंडमध्ये भाजप, खेडमध्ये उबाठा, जुन्नरमध्ये शिंदेसेनेचे सभापती व उपसभापती झाले आहेत.
मुळशीत मांडेकरांनी समीकरणं जुळविले
मुळशी, भोर, वेल्हा या तिन्ही पंचायत समित्या राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) यांनी ताब्यात घेतल्या. मुळशी पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसने तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दोन सदस्य निवडून आले होते. तर भाजपला केवळ एक जागा जिंकता आली. या ठिकाणी शरद पवार गटाला बरोबर घेऊन सभापतीपद मिळविण्यासाठी भाजपचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा प्रयत्न होता. पण मांडेकर यांना पवार गटाचे दोन सदस्य बरोबर घेत सत्ता मिळविली आहे. पवार गटाकडे उपसभापतीपद दिले आहे.
जुन्नर
सभापती-कमल बाळू शेळकंदे-शिवसेना
उपसभापती-अमित अनंता ढोले-शिवसेना-उबाठा
———-
आंबेगाव
सभापती-कैलास भिमाजी काळे-राष्ट्रवादी
उपसभापती-ज्योती प्रवीण पारधी-राष्ट्रवादी
—————-
शिरुर
सभापती-स्वाती विठ्ठल घावटे-राष्ट्रवादी
उपसभापती-रामराव बबन सासवडे-राष्ट्रवादी
———
खेड
सभापती-विद्या सयाजी मोहिते-शिवसेना-उबाठा
उपसभापती-मंगेश गुलाब सावंत-शिवसेना-उबाठा
———
मावळ
सभापती-सुनीता मनोहर येवले-राष्ट्रवादी
उपसभापती-साहेबराव नारायण कारके-राष्ट्रवादी
दौंड
सभापती-सुखदेव सोनबा चोरमले-भाजप
उपसभापती-अमृता अभिमन्यू गिरमकर-भाजप
———
बारामती
सभापती-किरण रावसाहेब तावरे-राष्ट्रवादी
शुभांगी सुनील आगवणे-राष्ट्रवादी
———–
पुरंदर
सभापती-अमित भाऊसाहेब झेंडे-राष्ट्रवादी
उपसभापती-प्रवीण बाळासाहेब जगताप-शिवसेना-शिंदे
———
इंदापूर
सभापती-हर्षवर्धन मधुकर लोंढे-राष्ट्रवादी
उपसभापती-जयकुमार गोपाळ कारंडे-राष्ट्रवादी
——–
भोर
सभापती-मनिषा संतोष कंक-राष्ट्रवादी
उपसभापती विलास सुभाष कोंडे-राष्ट्रवादी
———-
मुळशी
सभापती-मंदा कृष्णराव शेळके-राष्ट्रवादी
उपसभापती-दगडू नामदेव करंजावणे-राष्ट्रवादी-शरद पवार
वेल्हा-राजगड
सभापती-सुवर्णा किरण राऊत-राष्ट्रवादी
उपसभापती-संदीप लहू खुटवड-राष्ट्रवादी
———–
हवेली
सभापती-युवराज हिरामन काकडे-राष्ट्रवादी
उपसभापती-विद्या दत्तात्रय गायकवाड-राष्ट्रवादी
—————–
