Petrol and diesel theft gang busted by crime branch : दिवसेंदिवस इंधन चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं इंधन माफियाविरोधात आता पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पेट्रोल, (petrol) डिझेलची (Diesel) चोरी करून काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीवर पुणे पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. हडपसर येथे झालेल्या या कारवाईत पोलिसानी 8 टॅंकरसह एकूण 2 कोटी 28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्याच्या हद्दीत काल (शनिवार दि. 8 एप्रिल) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याचे वपोनि अरविंद गोकुळे यांनी तपास पथकाला सूचना दिलेल्या होत्या. त्याचे अनुषंगाने सहायक पो. नि. विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरूध्द सोनवणे, भगवान हंबर्डे, मनोज सुरवसे, अमोल दणके, रशिद शेख असे काल पहाटे हडपसर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक अनुषंगाने पेट्रोलींग करीत होते. त्यावेळी तपास पथकातील पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना त्यांचे माहिती मिळाली की, लक्ष्मी कॉलनी, गजानन मित्र मंडळाळजवळ, १५ नंबर चोक, हडपसर पुणे येथे वाशी नवी मुंबई येथुन एटीफ पेट्रोल (विमना करीता वापरण्यात येणारे पेट्रोल) भरुन येणारे काही टॅंकर शिर्डी
एअरपोर्ट कडे जाणार आहेत. या टॅंकरचा मार्ग आणि प्रवासाची वेळ कंपनीने नियोजित केलेली असते. शिवाय, टॅंकर मधील इंधन बाहेर काढता येवु नये या करीता कंपनीने अँंटो लॉक व सील केलेले असते. असे असताना देखील काही इसम हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, रिलायन्सच्या गाडीमधून प्लास्टीक कॅन्डमध्ये अवैधरित्या पेट्रोल व डिझेल या ज्वलनशील इंधनाची चोरी करणार आहेत.
Eknath Shinde यांचा पवार, ठाकरेंवर निशाणा… म्हटले काहींना हिंदूंची अलर्जी होतेय!
ही माहिती मिळाल्यानंतर अरविंद गोकुळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात संपर्क साधून त्यांनी या चोरीची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी साडेसहा वाजताच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना दोन एचपीसीएल कंपनीचे टॅंकर मधील वॉल बॉक्स मधुन इंधन काढतांना काही इसमांना पकडले. या ठिकाणी इंधनाने भरलेले 14 प्लॅस्टीकचे कॅन मिळुन आले.
त्यामुळे पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी सबंधित एचपीसीएल कंपनीचे अधिकारी व परीमंडळचे विभागाचे अधिकारी यांना पत्रव्यबहार करुन बोलावून घेतले.
सदर ठिकाणी सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे यांनी तात्काळ भेट दिली. या घटनेबाबत पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर-554/2023 भा.द.वि. कलम- 379,285,34 सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 चे कलम 3,7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैधरित्या पेट्रोलची चोरी करणाऱ्या इसमांची नावे
1) सुनिलकुमार प्राननाथ यादव वय 24 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या लक्ष्मी कॉलनी, दत्त मंदिराजवळ, हडपसर पुणे. मुळ राहणार-काछा पूरेबोधराम का पुरवा, पोस्ट- दूल्हेपूर काछा, दुल्हेपूर प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश
2) दाजीराम लक्ष्मण काळेल वय 37 वर्षे, धंदा- ड्रायव्हर, राहणार- सध्या- विठ्ठलनगर, दुर्वाकुर पार्क, हडपसर पुणे मुळ राहणार- मु.पो. वळई ता. माण, जि. सातारा
3) सचिन रामदास तांबे वय 40 वर्षे, धंदा- ट्रान्सपोर्ट व्यवसाय, राहणार- 15 नंबर विठड्ठलनगर, दुर्वाक्र पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे.
4) शास्त्री कवलु सरोज वय 48 वर्ष, धंदा- मजुरी, राहणार- सध्या 15 नंबर विठठलनगर, दुर्वाक्र पार्क, सत्यराज बिल्डींगच्या पाठीमागे, हडपसर पुणे.
यांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींनी सांगितले की, त्यांनी पुणे येथील रहिवासी असलेले सुनिल रामदास तांबे यांच्या सांगण्यावरून चोरी केली आहे.
पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात पेट्रोल/डिझेल चोरी करण्याचे साहित्य, ०8 पेट्रोलचे टॅंकर, 14 पेट्रोल कॅण्ड, इलेक्ट्रिक मोटारपंप असे दोन कोटी अड्डाविस लाख पाच हजार नउशे पंचान्यवर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.