Download App

Pimpri News : पंगा घेणाऱ्या थोरातांचा पत्ता कट तर, आमदार लांडगेंनाही जगतापांचा सूचक इशारा

  • Written By: Last Updated:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची तब्बल दोन महिन्यानंतर रविवारी (ता. 17 सप्टेंबर) कार्यकारणी जाहीर केली. या कार्यकारणीच्या माध्यमातून जगताप यांनी आपल्याशी पंगा घेत असलेल्या अमोल थोरात (Amol Thorat) यांना घरचा रस्ता दाखवला तर, आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांच्या समर्थकांना डावलत आमदार लांडगेंच्या दादागिरीला (वाढता प्रभाव) लगाम लावत आपणच शहराचे शेठ असल्याचं दाखवून दिल आहे. (BJP Pimpri Chichwad City executive lits)

Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!

शंकर जगताप यांची नवीन कार्यकारिणी ही 129 सदस्याची असून यामध्ये गावकी-भावकी पलीकडे जाऊन मूळ शहरातील नसलेल्या कार्यकर्त्यांना आपल्या कार्यकारणीत मानाचं पान दिलं आहे. तर, जुन्या पाच सरचिटणीसांपैकी तीन सरचिटणीसांना कार्यकारणीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे लांडगे समर्थकांसह इतर काही भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी शंकर जगताप यांनी ओढवून घेतली आहे. यातही अमोल थोरात यांचा पत्ता कट झाल्याची जोरदार चर्चा आहे.

शंकर जगताप यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर थोरातांनी पत्र काढून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आमदारकी तर, शंकर जगताप यांना शहराध्यक्ष पद देऊन भाजप घराणेशाहीकडे झुकलंय, अशी जगताप कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यांची हीच टीका त्यांना भोवली आणि कार्यकारणीतून पत्ता कट झाला, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

Maharashtra Politics : सुळेंचे भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आव्हान, तटकरेंनी थेट निकालच सांगितला

गत कार्यकारणीतील सरचिटणीसांपैकी महेश लांडगे यांचे समर्थक विजय फुगे तसेच भाजपचे निष्ठावंत असलेले मोरेश्वर शेडगे यांना स्थान देण्यात आलेले नाही. दुसरीकडे लांडगे विरोधक शैला मोळक यांची सरचिटणीस पदी नियुक्ती करत लांडगे गटाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. मात्र, भाजप निष्ठावंतांना कार्यकारणीत स्थान देत समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राजू दुर्गे यांना उपाध्यक्षपदापाठोपाठ प्रवक्ते पदही बहाल केल्याने त्यांची लॉटरी लागली आहे.शंकर जगतापांच्या नवीन कार्यकारणीमध्ये सरचिटणीसपदी नामदेव ढाके, विलास मडिगिरी, संजय मंगोडेकर, शैला मोळक, अजय पाताडे, शितल उर्फ विजय शिंदे आदींची नेमणूक करत जगतापांनी समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महेश लांडगे यांचा पिंपरी-चिंचवड भाजपचे दादा (सर्वेसर्वा) म्हणून वावर होता. मात्र, पोटनिवडणुकीमध्ये शंकर जगताप इच्छुक असूनही पक्षाने त्यांच्या ऐवजी त्यांच्या वहिनी अश्विनी जगताप यांना तिकीट दिलं आणि त्या निवडूनही आल्या. त्यानंतर फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे शंकर जगताप यांच्या गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ टाकत शहर भाजपमध्ये लांडगे आणि जगताप यांच्यात बॅलन्स राखला.

Rohit Pawar : तरीही अजितदादांचे सहकारी गप्प का? रोहित पवारांना वेगळाच संशय

त्यानंतर जगतापांनी आपल्या कार्यकारणीच्या माध्यमातून आपल्याशी पंगा घेणारे थोरात आणि लांडगे समर्थक असलेल्या पदाधिकाऱ्यांचा लांडगेंनाही न जुमानता बंदोबस्त लावला असून, यातून एकप्रकारे आपला इरादा स्पष्ट केला आहे. यामुळे लांडगे आणि जगताप यांच्यामध्ये काही अलबेल नाही, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे पुढील काळात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने लांडगे आणि जगताप यांच्यात शहकटशहाच राजकारण पाहायला मिळू शकतं, यात मात्र शंका नाही.

बबनराव घोलपांच्या मनात काय ?

Tags

follow us