भाजपला याच गोष्टी पार्टी विथ डिफरन्स बनवतात; धंगेकरांच्या स्पेशल X डावानं वारं फिरणार?

Ravindra Dhangekar प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

भाजपला याच गोष्टी पार्टी विथ डिफरन्स बनवतात; धंगेकरांच्या स्पेशल X डावनं वारं फिरणार?

भाजपला याच गोष्टी पार्टी विथ डिफरन्स बनवतात; धंगेकरांच्या स्पेशल X डावनं वारं फिरणार?

Ravindra Dhangekar X Post : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उद्या (दि.15) मतदान पार पडणार असून, प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय पक्षांनी एकमेकांवर जोरदार आरोप पत्यारोपांच्या फैरी झाडल्याचे पाहण्यास मिळाले. त्यात पुण्यात अजित पवार आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगल्याचे पाहण्यास मिळाले. तर, ऐनवेळी शिंदे आणि भाजपचं जागा वाटपावरून खटके उडाले. आता शिंदेंचे नेते आणि माजी आमदार धंगेकरांनी मतदानापूर्वी एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे धंगेकरांच्या या व्हिडिओची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.

पुण्यात सांगता सभेत आशीर्वाद मिळतो; अलार्म बंद करा अन् कमळाला विजयी करा; फडणवीसांचा दादांना पंच

धंगेकरांचा व्हिडिओ बॉम्ब नेमका काय?

मतदानाच्या आदल्यादिवशी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती एक पोस्ट शेअर करत भाजपवर हल्लाबोल करत बॉम्ब टाकला आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी वाटताना चारित्र्यहीन लोकांचे वेगळी आरक्षण टाकले असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

खरतर प्रचार प्रमुखच महापालिकेच्या टेंडरचा पैसा डान्सबार मध्ये उडवत असेल तर तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून काय अपेक्षा ठेवणार ते सुद्धा या चारित्र्यही क्वालिटीचेच आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार असलेल्या एका महिलेच्या पतीचा देखील असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती शिवाजीनगर मतदारसंघाच्या आमदारांचे सर्व आर्थिक विषय सांभाळतो. आणि या सगळ्या आर्थिक विषयातून केलेल्या कमवलेल्या पैशात बारबाळांसाठी कोटा आरक्षित ठेवलेला आहे.

तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही सहन करणार, असं होणार नाही; महेश लांडगेंचा अजित पवारांना स्पष्ट इशारा

संस्कृतीच्या गप्पा मारणारे खासदार मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी या गोष्टीचा खुलासा तरी करावा की अशा किती जागा चारित्र्यहीन लोकांसाठी राखीव आहेत. असो ते भाजप आहे या सर्व गोष्टीच त्यांना पार्टी विथ डिफरन्स बनवतात असा टोलाही धंगेकरांनी लगावला आहे. धंगेकरांच्या व्हिडिओमुळे आता शहरातील मतदानावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

https://twitter.com/DhangekarRavii/status/2011169661438902460

Exit mobile version